आंदोलन गावात करा की मुंबईत करा, तूर्तास तरी आंदोलनाने मराठा समाजाला कोणताही जास्तीचा किंवा नवीन लाभ मिळणार नाही. सरकारने काय दिले आणि आंदोलनाने काय मिळाले याचा विचार करण्यात समाजाची दोन वर्षे गेली. आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण गरजूंना आरक्षणापर्यंत पोहोचवणे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे, असे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, आंदोलकांना आंदोलन सुरू ठेवायचे आहे. पण मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत वास्तव भूमिका घेण्याची नैतिकता सरकारमधील मुख्यमंत्री, मंत्री, प्रशासनिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे नाही. गेल्या तीन वर्षांत हेच सिद्ध झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सन्मानाने लिखित निमंत्रण देऊन समोरासमोर चर्चेला बोलवावे. ते चर्चेला येत नसतील तर मुंबई उच्च न्यायालयात वस्तुस्थिती मांडावी. योग्य आदेश प्राप्त करून जाहीर चर्चा घडवावी. त्याचे थेट लाईव्ह प्रसारण करावे. या चर्चेत दोन्ही बाजूंनी आरक्षणाचे, आंदोलनाचे, सामाजिक न्यायाचे सर्व संविधानिक पैलू समोरासमोर मांडावेत. म्हणजे समाजाच्या व राज्याच्या हिताचा काही तरी तोडगा निघेल आणि कोण खरे तेही कळेल. कोणत्याही परिस्थितीत राज्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ..त्यासाठी सरकार सोबतच मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, 2018 मध्ये दिलेले SEBC आरक्षण गेले त्यात सरकारची चूक आहे. जून 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात 50% वरील SEBC आरक्षण कसे टिकले? कारण कोर्टासमोर राज्यातील आरक्षणाचे वास्तव मांडले गेले होते. आताही SEBC आरक्षणाची लढाई उच्च न्यायालयात आहे. SEBC टीकणारच नाही, हे अर्धसत्य आहे. ते टिकूही शकते. त्यासाठी सरकार सोबतच मराठा समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ..तोपर्यंत दुसरे आरक्षण कायद्याने देता येत नाही डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, मराठ्यांचे आरक्षण म्हणजे SEBC आरक्षण आहे. त्यात ओबीसी आरक्षणाचे सगळे फायदे देण्याची तरतूद मूळ कायद्यातच आहे. आता त्यासाठी स्वतंत्र GR सुद्धा काढला आहे. मराठ्यांचे SEBC टिकले नाही तर मराठा समाज आरक्षणास पात्र नाही हे पुन्हा सिद्ध होईल. तसेच जोपर्यंत SEBC आहे, तो पर्यंत मराठा समाजाला दुसरे कोणतेही आरक्षण कायद्याने देता येत नाही. प्रशासनिक अडचणीसाठी मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची खरी गरज आहे. केंद्रातील नोकरी व शिक्षणात मराठा समाजाला EWS लागू आहे. पण आरक्षणाचा प्रश्न मात्र सुटत नाही डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, दिनांक 1 जून 2004 चा GR आणि 28 फेब्रुवारी 2018 चे परिपत्रक यांचा आधार घेऊन ऑगस्ट 2023 मध्ये जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाले. तेंव्हा कुणबी नोंदी शोधण्याचा विषयच नव्हता; तर 1881 ची जनगणना आणि 1909 चे हैद्राबाद गॅझेट यांच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून आरक्षणाचे लाभ द्यावेत हीच मुख्य मागणी होती. पुढच्या वाटाघाटीत महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या, सगे सोयरे GR काढा असे रूपांतर झाले.
जरांगे पाटील यांनी प्रत्येक वेळी आंदोलनाची घोषणा करण्यापूर्वी कोणती मागणी केली आणि आंदोलन मागे घेताना कोणती मागणी मंजूर झाली, याचे रेकॉर्ड छापील बातम्या आणि यु - ट्यूब वरील व्हिडीओत उपलब्ध आहे. ते कोणीही तपासू शकतो. दरवेळेला आंदोलन यशस्वी होते. पण आरक्षणाचा प्रश्न मात्र सुटत नाही, हे वास्तव आहे. ..तर तो मार्ग कायमचा बंद होईल डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, जरांगे पाटील यांचे आंदोलन कुणब्यांच्या आरक्षणाचे आहे. जो कुणबी नाही, त्याला कुणबी दाखले मिळू शकत नाहीत. ज्याच्याकडे कुणबी नोंद आहे किंवा ज्याच्या भावकीत, रक्ताच्या नात्यात प्रमाणित कुणबी दाखला आहे, त्याला कुणबी दाखले मिळतात. त्यासाठी आवश्यक नियम 1967 पासून लागू आहेत. सध्या सरकार फक्त कुणबी नोंदीबाबत प्रशासनिक अडचणी दूर करण्यास मदत करीत आहे.
कोणते आरक्षण मराठ्यांसाठी जास्त फायद्याचे - SEBC, EWS की कुणबी? EWS सर्वात कमी फायद्याचे आहे. SEBC गेले तर EWS आपोआपच मिळेल. पण SEBC की कुणबी? असा पर्याय सध्या उपलब्ध नाही. आंदोलनाने असा पर्याय निर्माण होणार नाही. पण आता SEBC टिकले नाही तर मराठ्यांना भविष्यात घटनात्मक 50% त येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. SEBC टिकले तर केंद्रातही मराठा म्हणून ओबीसीत समावेश शक्य होईल. SEBC आरक्षण टिकविणे हेच मराठा समाजाच्या हिताचे डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, कुणबी दाखले मिळण्यासाठी 2024 पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व नोंदी सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आहेत. त्यानंतर 2 सप्टेंबर 2025 रोजी वंशावळ जुळवण्यासाठी स्थानिक समितीला अधिकार देणारा GR सुद्धा काढला आहे. त्यात आणखी नवीन काही मिळण्याची शक्यता संपलेली आहे. हजारो कुणबी दाखल्याची जात पडताळणी यशस्वी झाली आहे. उपलब्ध नोंदीची किंवा वंशावळीची अट आणि आवश्यक प्रक्रिया यात कोणालाही कायद्याने सुट मिळू शकत नाही. प्राप्त परिस्थितीत SEBC आरक्षण टिकविणे हेच मराठा समाजाच्या हिताचे ठरणार आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. पण त्यासाठी मराठा समाजाने एकमुखी आग्रही मागणी तरी केली पाहिजे ना? ज्यांची कुणबी नोंद मिळाली व ज्यांची कुणबी दाखल्याची सोय झाली, त्यांनी मराठा समाजाबद्दल विचार करण्याची गरजही उरली नाही. पण 2027 मध्ये जातनिहाय जनगणनेनंतर आरक्षणाची समीकरणे पुन्हा बदलतील. या जनगणनेत कुणबी करणाच्या नावाखाली मराठ्यांची लोकसंख्या घटणार, हे वास्तव आहे. म्हणजे कुणबी होण्याच्या नादात मराठा समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यातच मराठा समाजाची दोन वर्षे गेली डॉ. बाळासाहेब सराटे म्हणाले की, मराठा समाजाला आज आरक्षणाचे लाभ मिळत आहेत. पण शिक्षणाचे काय? योग्य शिक्षण मिळून किमान शैक्षणिक गुणवत्ता असल्याशिवाय आरक्षणाचे लाभ मिळू शकत नाहीत. प्रगत कुटुंबातील मुलांनाच सध्या आरक्षणाचे लाभ मिळतात. पण आंदोलनात मात्र ग्रामीण भागातील गरीब मराठा पुढे असतो. ग्रामीण भागातील शालेय शिक्षण धोक्यात आले आहे. गरीब मराठा कुटुंबांना इंग्रजी शाळांची फी परवडणार आहे का? उच्च शिक्षणाचे खाजगीकरण, कोचिंगचा खर्च, प्रवेश परीक्षा, जीवघेणी स्पर्धा या गोष्टीमुळे गरीब मराठा मुलांवर अन्याय होत आहे. पण त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. वर्षानुवर्षे MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांत मराठा मुलांचा मोठा भरणा आहे. त्याला कारण आरक्षण नव्हे, तर नोकरीची घटणारी संख्या आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
- पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!
महाराष्ट्र
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- गोवा: बोरीच्या साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचा वाद विकोपाला; ग्रामस्थांवर पोलिसांची मोठी कारवाई, काहीजण ताब्यात!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



