छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी आणि परीक्षेतील गंभीर गैरव्यवस्थेविरोधात नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येताच, संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. या देशव्यापी आंदोलनात अत्यंत आक्रमकपणे आघाडीवर असलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक तथा तरुण विद्यार्थी नेता अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांनी या ऐतिहासिक क्षणानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मुलाच्या संघर्षाला यश मिळाल्यानंतर अभिजीतच्या आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले असून, "बाळा, आता तू घरी ये," अशी भावनिक हाक त्यांनी आपल्या मुलाला दिली आहे.
"गेल्या ३० दिवसांपासून रात्री झोप नव्हती": आई अनिता दिपके
अभिजीतची आई अनिता दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत जड अंतःकरणाने आणि अभिमानाने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "अभिजीत दिल्लीला आंदोलनासाठी गेल्यानंतर आम्हाला त्याची सतत प्रचंड काळजी वाटत होती. मागील एक महिन्यापासून आमच्या डोळ्यांना रात्रीची नीट झोप लागली नव्हती. घरातील टीव्ही आणि मोबाईलवर काय सुरू आहे हे पाहण्याचीही आमची हिंमत होत नव्हती. आंदोलनादरम्यान जेव्हा त्याला टायफॉइड झाल्याची बातमी समजली, तेव्हा आमचे मन सुन्न झाले आणि आम्ही प्रचंड अस्वस्थ झालो होतो. आम्ही त्याला भेटण्यासाठी दिल्लीला येतो असे सांगितले होते, परंतु त्याने आम्हाला तिकडेच थांबण्यास सांगून 'मी माझी काळजी घेतो, तुम्ही काळजी करू नका' असे म्हणून आम्हाला सांभाळून घेतले."
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "आज शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे या संघर्षाला जे यश मिळाले आहे, ते केवळ माझ्या एकाट्या मुलाचे नसून देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे आणि संघर्षाचे मोठे यश आहे. एका आईच्या मनाची घालमेल या संघर्षात खूप काही सहन करून गेली आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे मी उद्याच माझ्या मुलाला सांगणार आहे की, बाळ बस आता पुरे, तू आता लवकर घरी परत ये, नाहीतर आम्ही स्वतः तुला घेण्यासाठी तिकडे येतो."
वडिलांची भावनिक प्रतिक्रिया:
अभिजीतचे वडील भगवान दिपके यांनीही आपल्या मुलाच्या या खडतर आणि जिद्दी प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, "आमचा मुलगा देशातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी लढत होता. सुरुवातीला तो एकांतात किंवा छोट्या पातळीवर आवाज उठवत होता, परंतु आज त्याच्या या लढ्याला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला आणि सरकारने त्याची दखल घेतली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. एक आई-वडील म्हणून मुलाची काळजी वाटणे सहाजिक होते, पण त्याचा हा संघर्ष सत्याचा आणि न्यायाचा होता."
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलकांनी आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला असून, अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांचा हा भावनिक संदेश सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




