अनेक व्यक्ती आणि कुटुंबांचा मिळून समाज बनतो. ते परस्पर संबंधित असतात. केवळ एक मोठा समूह असेल तर त्याला समाज म्हणता येणार नाही. परस्पर संबंधांच्या सूत्रामध्ये एकमेकांना बांधले गेल्याने समाज बनतो. फुलांचा ढीग ही असतो आणि माळ ही असते. एका धाग्यामध्ये बांधल्या गेल्यामुळे माळेचे महत्व अधिक असते. फुलांना परस्पर जोडून त्याला माळीचे स्वरूप देणारा धागाच त्या ठिकाणी अधिक महत्त्वाचा असतो. समाजातील सर्व घटकांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून असते. एकमेकावर उपकार करत जगत असताना सह-अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. उद्योगनिष्ठ व्यक्ती काम करणाऱ्या कामगारांना वेतन देतो, त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करतो. तर तिथे काम करणारे कामगार व्यवसायिकाच्या हिताचे रक्षण करतात. आश्रमामध्ये आचार्य गुरु शिष्यांना ज्ञान देतात, शिष्य ज्ञान प्राप्तीच्या पवित्र उद्देशाने गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांना संतोष देतात. समाजामध्ये कोणी कोणाला काम देतं, ज्ञान देतं, तर अन्य व्यक्ती त्यांचे कार्य सहज सुलभ करतात. एकंदरीत समाजामधील सर्व घटकांची परस्पर सह अस्तित्वाची शृंखला असते. मुळातच वैयक्तिक आणि सामाजिक जीवन हे मात्र संघर्ष आणि विवादांच्या उद्देशावर आधारित नाही. जीवनात संघर्ष असतो आणि असावा परंतू संघर्षासच मूळ आणि प्रमुख मानले तर तो माणसाला आणि समाजाला हिंसेकडे घेऊन जातो. याउलट परस्पर सहकार्य सह-अस्तित्वाची धारणा मनुष्याला, समाजाला अहिंसेकडे घेऊन जाते आणि तिथे शांती हा उद्देश बनतो. संघर्ष हा वैयक्तिक आणि सामाजिक विकासाचे कारण असला तरी व्यक्ती आणि समाजाचे संतुलित संवर्धन सह अस्तित्व आणि शांतीच्या मार्गानेच होत असते. केवळ आणि केवळ संघर्ष हा विनाशाकडेच नेत असतो. वर्तमान समाजाची स्थिरता आणि जडणघडण ही आर्थिक व्यवस्था आणि विविध स्पर्धात्मक परिस्थितीवर अवलंबून आहे. आज-काल आर्थिक परिस्थिती चांगली तर तो व्यक्ती चांगला आणि कामाचा अशी सामान्य धारणा बनली आहे. अर्थातच यामध्ये व्यक्तीच्या इतर योग्यतेची नक्कीच उपेक्षा होते. म्हणूनच व्यक्ती, आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या तिन्ही तत्त्वांचे परस्पर अपेक्षेने संतुलन साधले तरच सर्वांगीण विकास आणि संवर्धन शांततेच्या उद्देशाकडे नक्कीच नेईल. रुस, चीन आणि त्यासारख्या इतर अनेक देशांमध्ये आर्थिक व्यवस्था आणि समाज व्यवस्था यांच्या बदलांवरती खूप जोर दिला गेला. व्यक्तीला सोडून तेथील व्यवस्था बदलल्या पण व्यक्तीमध्ये परिवर्तन आले नाही. इतक्या मोठ्या नियंत्रणाच्या स्थितीमध्ये देखील तेथे अपराध होतातच. म्हणूनच केवळ व्यवस्था ही परिवर्तनासाठी पुरेशी नसते. त्या सोबतच व्यक्तिगत स्तरावरील हृदय परिवर्तन व सह-अस्तित्व हे मुळात असायला हवेच. आर्थिक परिस्थिती प्रमाणेच जाती भेद, रंग भेद, संप्रदाय भेद अशाही काही गोष्टींनी माणसा माणसांमध्ये, समाजा समाजामध्ये परस्पर भेदभावाच्या खोल दऱ्या निर्माण केल्या. या बाबतीत ज्याच्यामध्ये जितकी अधिक कट्टरता असेल तितकंच अधिक शत्रुत्व आणि द्वेष त्यामध्ये दिसतो. त्यामध्ये मैत्रीच्या तत्वाला आणि भावनेला फारशी जागा उरत नाही. येथेच सह-अस्तित्वाच्या तत्वाला तडा पोहचतो आणि व्यक्ती आणि समाज हिंसेकडे अधिक प्रवृत्त होतो. परस्पर द्वेष आणि हिंसा या प्रवृत्तींचा प्रचार प्रसार करण्यासाठी जितकी मेहनत घ्यावी लागत नाही त्यापेक्षा अधिक कष्ट मैत्री आणि परस्परसह अस्तित्व ही तत्व समजावण्यासाठी घ्यावे लागतात. समाजात सद्भावना रुजवायची तर फार मोठा प्रयत्न करावा लागतो. द्वेष, शत्रुता आणि अशांती हे फारसे समजून सांगावे लागत नसते. तर मैत्री सह-अस्तित्व आणि शांतता हे समजून सांगण्यासाठी मात्र फार मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मुळात समाजाची जडणघडण आणि स्थिरता सह-अस्तित्व आणि अहिंसेच्या आधारावर आहे. प्राण्यां प्रमाणे प्रत्येक मनुष्य जर एकमेकाला संपवण्यासाठी सतत एक दुसऱ्याच्या अंगावर धावून आला असता तर समाज निर्माण झालाच नसता. म्हणूनच असे म्हणावे लागेल समाजाच्या स्थिरतेचा आणि जडण घडणीचा चा मुख्य आधारस्तंभ अहिंसा आणि परस्पर सह-अस्तित्व हाच आहे. " परस्परोपग्रहो जीवानाम् " हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र जैन तीर्थंकर भगवान महावीरांनी समाजाला दिलेले सर्वात उच्चतम तत्त्व आहे. सर्व जीव एकमेकांच्या आधाराने एकमेकावर उपकार करत सह-अस्तित्वाच्या भावनेने जगत असतात. आणि याच अपेक्षेने स्वतः जगावे, जशी अपेक्षा दुसऱ्याकडून असते तसेच आपण त्याच्या ही अपेक्षांना ही पूर्ण करावे. या एका सूत्रामध्येच अहिंसक समाज जीवनाचे आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचे मुख्य बीज सामावलेले आहे. सह-अस्तित्व आणि अहिंसा हाच खरा मूळ शाश्वत धर्म आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा मुख्य आधार स्तंभ आहे. मानव समाजाच्या अस्तित्वालाच जेव्हा विनाशाचा मोठा धोका जाणवतो तेव्हा मात्र सर्वस्व विनाशाच्या भयंकर कल्पनेने अहिंसेची आठवण येते. परंतु यामध्ये एक मोठी चुकीची धारणा झाली. ती अशी की आम्ही अहिंसेला केवळ संकटातून बाहेर पडण्याचा उपाय इतकेच मानले. सर्वकाळ शांतीपूर्ण संतुलित संवर्धनासाठी मात्र सतत अहिंसा आणि सह अस्तित्वाचा विचार झाला पाहिजे आणि ते व्यवहार आणि आचरणात असावे. तरच वर्तमान आणि भविष्यात व्यक्ती समाज आणि विश्वामध्ये समाधान आणि शांतता अस्तित्वात असेल. व्यक्तीच्या सामाजिक संबंधांच्या सीमा ह्या खूप विस्तृत असतात. घरातील व्यक्ती, शेजारी-पाजारी आणि दूरवर असलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीसोबत प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संबंध येतोच. समाजातील व्यक्तींच्या परस्पर संबंधांमध्ये जर स्वार्थाची प्रेरणा असेल आणि निस्वार्थ भाव नसतील तेव्हा मात्र स्वतःच्या हिता मध्ये बाधा उत्पन्न झाली तर परिस्थिती परस्पर संबंध तोडण्यापर्यंत येते. परंतु अहिंसा आणि सह अस्तित्वाची भावना समाजातील व्यक्तींमध्ये अत्यंत प्रबळ अशी रुजलेली असेल तर समाजाचे घटक एकमेकाला सहन करत जीवन जगतात. अशा स्थितीत प्रत्येकाला स्वार्थ असूनही त्यांचा आपसामध्ये परस्परांचे अहित करणारा संघर्ष कमीच होतो. जातीभेद, वर्ण भेद, लिंग भेद, वर्ग भेद या गोष्टींना आधार मानत असताना माणसा माणसांमधील दुरावा नक्कीच वाढत गेला, हा दुरावाच परस्पर सह-अस्तित्व आणि सामाजिक एकते साठी अत्यंत घातक बनला. अशा कारणांनीच समाजातील शांतता भंग पावते. या सर्व विविधते पेक्षा उच्च पातळीचे एक तत्व आहे आणि ते म्हणजे माणुसकी, मानवी एकता. मी मनुष्य आहे त्याप्रमाणे समोरील व्यक्ती देखील मनुष्यच आहे. मी समोरच्या व्यक्तीकडून जशा प्रकारच्या व्यवहाराची अपेक्षा करतो तशीच अपेक्षा त्याची देखील आहे. अशा प्रकारच्या उदार चिंतनशील विचारानेच पृथ्वीतलावर मानवाचा शांतीपूर्ण सह अस्तित्वाच्या मार्गाने विकास संभव आहे.
(बलराज संघई, 9420015108 | वाळूज औद्योगिक वसाहत, छत्रपती संभाजीनगर)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

वारजेत नुकताच डांबर टाकलेला रस्ता हातानेच निघाला; निकृष्ट कामाचा VIDEO समोर!
रिक्षाचालकाने लक्झरी ट्रॅव्हल्सची चावी घेतली; वाकडमध्ये वाहतूक कोंडी!
हत्तीच्या पोटाखाली बसून चक्क ‘तीन पत्ती’चा डाव; VIDEO व्हायरल!
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!

























Subscribe to my channel



