
Marathwada Water Issue : पुढील दोन दिवसांत नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, अशी मागणी करत नांदूर मध्यमेश्वर धरणाजवळ आंदोलन करण्यात आले आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्याचबरोबर जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
दरवर्षीं नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक पाणी सोडण्यात येते. हे पाणी आरक्षित करण्यात येत असून मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून आज किंवा उद्या हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमधील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, या मागणीसाठी अमृता पवार यांच्या नेतत्वाखालील आंदोलन केले आहे.
|
|
यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे, निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणामार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे आता शासन याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात यावे यासाठी काही संघटनांनी आंदोलन देखील केल्याचे समोर येत आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मागणी लावून धरल्याने पाणी आवर्तनावर काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे.
विविध धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव....
प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे, यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून पाणी सोडल्यावर हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत अंदाजे 30 टक्के पाण्याचा नुकसान होते. त्यामुळे, जायकवाडी धरणात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, आणि यासाठी साडेबारा टीएमसी पाणी वरील विविध धरणातून सोडण्याचा प्रस्तावछत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला आहे. मात्र, जायकवाडीत साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, यासाठी 11 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बैठकीत 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!




























Subscribe to my channel




