पुणे: भोर तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भोर तालुक्यातील पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील महुडे-माळवाडी परिसरात दारूच्या आहारी गेलेल्या एका नराधम मुलाने "बाळा, दारू पिऊ नकोस" असा मोलाचा सल्ला देणाऱ्या स्वतःच्या जन्मदात्या आईचाच खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपी मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने बेदम प्रहार करत तिचा जीव घेतला आणि अत्यंत निर्दयीपणे मृतदेह घरातच सोडून घराला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला.
नेमकी घटना कशी घडली? पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महुडे-माळवाडी (ता. भोर) येथे बेबी काळू मालुसरे (वय ५२) या महिला राहत होत्या. त्यांचा ३१ वर्षीय मुलगा समीर काळू मालुसरे हा दारूच्या व्यसनाधीन होता. तो वारंवार दारू पिण्यासाठी घरात पैसे मागित असायचा किंवा दारूच्या नशेत धिंगाणा घालायचा. शुक्रवार (दि. ७) रोजी सायंकाळी याच कारणावरून मुलामध्ये आणि आईमध्ये वाद झाला.
मयत बेबी मालुसरे या आपल्या व्यसनाधीन मुलाला वारंवार "बाळा, दारू पिण्याचे व्यसन सोड, दारू पिऊ नकोस," अशी समजूत काढत होत्या आणि त्याला हटकत होत्या. मात्र, दारूच्या नशेत अन् वैफ्यात असलेल्या संशयित आरोपी समीर मालुसरे याला आईचा हा सल्ला खटकला. दारूच्या अंमलात असलेल्या संतापाच्या भरात त्याने घरातील लोखंडी रॉड थेट आपल्या आईच्या डोक्यात आणि तोंडावर जोरदारपणे मारला. या प्राणघातक आणि बेदम मारहाणीत बेबी मालुसरे या गंभीर दुखापत होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेह घरात कोंडून आरोपी फरार: आईचा खून केल्यानंतर आरोपी मुलाने हा सर्व प्रकार लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी अत्यंत विकृत मानसोपचार दाखवला. त्याने मृतदेह घरातच तसाच ठेवून घराला बाहेरून कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप उसळला.
पोलिसांची तत्पर कारवाई: या भयंकर हत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून पसार झालेल्या संशयित आरोपी समीर काळू मालुसरे (वय ३१) याला बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राजगड (भोर) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना


























Subscribe to my channel



