छत्रपती संभाजीनगर: शाळकरी मुलांना दिलेला स्मार्टफोन त्यांच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी कसा भयानक फास ठरू शकतो, याचा एक थरकाप उडवणारा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. ऑनलाइन गेमिंग अॅपच्या मोहात पडलेल्या सातव्या वर्गातील मुलीस डिजिटल जाळ्यात ओढून, तिला ब्लॅकमेल करत तिचे आक्षेपार्ह फोटो घेऊन तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सुशिक्षित कुटुंबातील मुलीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, मुलीने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोबाइलवर 'रॉब्लॉक्स' हा ऑनलाइन गेम डाऊनलोड केला. गेम खेळण्यासाठी ऑनलाइन पार्टनर शोधताना तिची ओळख 'आर्यन अत्रे' नाव सांगणाऱ्या ऑनलाइन गेमिंग आयडीधारकाशी झाली. दोन दिवसांतच आरोपीने मुलीला स्नॅपचॅटवर दोन आयडी तयार करून देत पासवर्डही दिले. पुढे दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. रॉब्लॉक्स, स्नॅपचॅटनंतर आरोपीने मुलीला व्हॉट्सअॅप सुरू करण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्यावर आई-वडिलांच्या फोनमधून पैसे काढून घेण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने व्हॉट्सअॅप सुरू केले. त्यावरून त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली.
चॅटिंगवरून थेट न्यूड फोटोपर्यंत
मार्चमध्ये आरोपीने तिच्याकडे तिच्या न्यूड फोटोंची मागणी केली. मुलीने नकार दिल्यावर ब्लॅकमेल करणे सुरू केले. घाबरून मुलीने स्वतःचे आक्षेपार्ह फोटो काढून त्याला पाठवले. जुलै २०२६ मध्ये त्याने मुलीला इन्स्टाग्राम अॅप इन्स्टॉल करायला लावले. आयांश ठाकरे व मुझमिल खान नावाने वेगवेगळ्या आयडीवरून चॅटिंग सुरू झाली. ५ ऑगस्ट रोजी संशयिताने मुलीच्या आई, वडिलांना कॉल करून तुमची मुलगी माझ्या भावाशी 'चॅटिंग' करते, त्यामुळे माझा भाऊ आत्महत्या करत आहे, असा बनाव रचून पालकांना घाबरवले. कुटुंबाने ७ ऑगस्ट रोजी पोलिसांकडे धाव घेतली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वादग्रस्त ठरलेला 'रॉब्लॉक्स' गेम काय आहे?
- जगातील करोडो मुलांमध्ये लोकप्रिय ठरलेला 'रॉब्लॉक्स' गेम लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानला जात आहे. जिथे मुले स्वतःचे गेम तयार करू शकतात आणि जगभरातील अनोळखी लोकांशी चॅट करत खेळू शकतात.
- नामांकित आंतरराष्ट्रीय माध्यमे, वृत्तपत्रांनी रॉब्लॉक्सबाबत लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण, फसवणुकीबाबत धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केले आहेत. कायदेतज्ज्ञांनी या गेमला बाल शोषकांसाठी 'डिजिटल हंटिंग ग्राउंड' (शिकारीचे ठिकाण) म्हटले आहे.
- गेममधील मोफत चॅट फीचरचा फायदा घेऊन सराईत गुन्हेगार लहान मुलांशी मैत्री करतात, त्यांना इन-गेम गिफ्ट्स किंवा पॉईंट्स देऊन जाळ्यात ओढतात आणि नंतर स्नॅपचॅट किंवा इन्स्टाग्रामवर नेऊन त्यांचे ब्लॅकमेलिंग करतात. अमेरिकेत सध्या या गेमिंग कंपनीविरोधात शेकडो पालकांनी न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
ब्रिटनमध्ये तरुणाला शिक्षा
एप्रिल २०२६ मध्ये ब्रिटनमध्ये रोब्लॉक्सवर १४ वर्षांच्या मुलीशी ओळख झाल्यानंतर तिला ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणाला २८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याने देखील लैंगिक स्वरूपाचे संभाषण, छायाचित्रांची देवाणघेवाण केल्याचे समोर आले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




