जयपूर: बायकोने अनावश्यक खर्च करु नये किंवा चोरांना सापडू नये, यासाठी राजस्थानमधील एका शेतकऱ्याने पाच लाख रुपयांची रोख रक्कम शेतात पुरुन ठेवली होती. मात्र रोकड नेमकी कुठे ठेवली होती, हे विसरल्यामुळे त्या शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागली. अखेर ती रक्कम सापडली खरी, पण तोपर्यंत वाळवीने ५०० रुपयांच्या नोटांचा अक्षरशः चुराडा केला होता.
ही घटना राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यातील नेवाई गावात घडली. मांगीलाल मेघवाल असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी पचपदरा येथे जमिनीचा एक भूखंड विकला होता. त्यातून त्याला ५ लाख रुपये मिळाले होते.
शेतात खड्डा खणून नोटा पुरल्या मांगीलाल यांना या पैशातून आपल्या शेतजमिनीवर एक पक्की खोली बांधायची होती. पैसे चोरीला जातील किंवा अनावश्यक खर्च होतील या भीतीने त्यांनी ती रक्कम एका पॉलिथिन पिशवीत भरली आणि शेतात खड्डा खणून ती पुरून ठेवली. मात्र, मांगीलाल यांना मद्यपानाचे व्यसन होते, आणि विसरभोळेपणा सवय. त्यामुळे पैसे नेमके कुठे लपवले होते हे ते विसरले.
नोटा पुरल्याची जागा विसरला पैशांची गरज भासली तेव्हा त्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ती जागा आठवत नव्हती. ते आपल्या कुटुंबासह शेतजमिनीवरच असलेल्या एका तात्पुरत्या घरात राहतात.
पैसे न सापडल्यामुळे अखेर मांगीलाल यांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना लपवलेल्या पैशांबद्दल सांगितले. सुरुवातीला कुटुंबाचा यावर विश्वास बसला नाही, पण नंतर त्यांनी पैसे शोधण्यासाठी शेताच्या विविध भागांत खणायला सुरुवात केली. त्यांचा हा शोधही निष्फळ ठरला.
वर्षभरानंतर भिजलेली पिशवी वर आली पैसे पुरल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर पाऊस पडल्यामुळे कुटुंब शेतात पेरणीची तयारी करु लागले. एका रात्री पैसे असलेली ती पॉलिथिन पिशवी अचानक जमिनीतून वर आली; मात्र अंधारामुळे ती कोणाच्याही लक्षात आली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मांगीलाल यांची पत्नी आणि मुलगा शेताभोवतीचे कुंपण दुरुस्त करत असताना त्यांना ती पिशवी दिसली. त्यांनी ती पिशवी उघडली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. पिशवीत ५०० रुपयांच्या नोटा होत्या, पण वाळवीने त्यांचं प्रचंड नुकसान केलं होतं आणि नोटांचे तुकडे झाले होते.
बँकेत गेल्यावर निराशा पदरी
काहीतरी मूल्य वसूल होईल या आशेने कुटुंबाने त्या खराब झालेल्या नोटा गोळा केल्या आणि पचपदरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेल्या. मात्र नोटांच्या खराब स्थितीमुळे बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला.
त्यानंतर हे कुटुंब बालोत्रा येथील एसबीआयच्या मुख्य शाखेत गेले पण तिथेही त्यांना परत पाठवण्यात आले. आपल्या कुटुंबाची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी मांगीलालने जी रक्कम जमिनीखाली गाडून ठेवली होती, ती वर्षभर तिथे राहिल्यामुळे खराब नोटांचा केवळ एक ढिगारा उरला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




