चंद्रपूर: अंगणवाड्यांमध्ये वितरित पोषण आहारातील तांदळाच्या नमुन्यात जिवंत किडे आढळल्याने नागपूर येथील प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने ते 'असुरक्षित अन्न' घोषित केले आहे. या घटनेने लहान बालकांच्या आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
महिला व बालविकास विभागाच्या नागपूर विभागीय उपआयुक्त कार्यालयाकडून संबंधित तपासणी अहवाल जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यांतील अंगणवाडी प्रकल्पांशी संबंधित नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गरम ताज्या आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या धान्याची तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी तो संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. यानंतरच्या दुसऱ्या तपासणी अहवालातही धक्कादायक चित्र समोर आले. गव्हामध्ये १.५३ टक्के बाह्य पदार्थ, वाटाण्यात ४.२८ टक्के रंग बदललेले दाणे तसेच ८.५३ टक्के इतर खाद्यधान्यांचे मिश्रण आढळले. निर्धारित मर्यादा अनुक्रमे एक टक्का, तीन टक्के आणि दोन टक्के आहे. या अहवालातील तांदळाच्या नमुन्यातही जिवंत किडे आढळले आणि तो नमुना पुन्हा एकदा 'असुरक्षित अन्न' म्हणून नोंदविण्यात आला आहे.
गहू, वाटाण्यातही निकषांचा भंग
एका अहवालात गव्हाच्या नमुन्यात १.६ टक्के बाह्य पदार्थ आढळले. अन्न सुरक्षा मानकानुसार त्याचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा अधिक नसावे.
वाटाण्याच्या नमुन्यात ४.३८ टक्के रंग बदललेले दाणे आढळले, तर निर्धारित मर्यादा तीन टक्के आहे. याच नमुन्यांमध्ये मूगडाळ, आयोडाइज्ड मीठ, साखर, मिरची पावडर आणि हळद या पदार्थांचे नमुने निर्धारित निकषांमध्ये असल्याचे अहवालात नमूद आहे.
लहान बालके व गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ : विजय वडेट्टीवार
अंगणवाडीतील बालकांच्या पोषणासाठी वितरित होणाऱ्या अन्नधान्याच्या नमुन्यांतच असे गंभीर दोष आढळल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. हाच आहार गर्भवती महिलांनाही दिला जातो.
हा प्रकार राज्यभर झाल्याचे नाकारता येत नाही. हा लहान बालकांसह गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ आहे. निकृष्ट व असुरक्षित अन्नधान्याचा पुरवठा कुठून झाला, त्यासाठी जबाबदार कोण? संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी हा अहवाल दाखवत काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


