
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, श्रीमती चित्रा वाघ, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्यासाठी 8650567567 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ‘रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या आनंद मेळाव्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत एक वर्षातील आढावा घेणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.
|
|
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटींचा आकडा कधी पोहोचला हे समजलेसुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाहीत, मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो.
आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची काळजी घेण्याचे काम या सरकारने केले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!



























Subscribe to my channel




