पुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच यंदाची उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
पुणे : पुणे शहरात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून मागील तीन दिवसांपासून सातत्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे.
लोहगाव येथे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडत असून कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडताना दोनदा विचार करत आहेत. सकाळी 10 नंतरच सूर्याचा चटका वाढू लागतो आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होते.
हवामान विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, या कालावधीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जर अत्यावश्यक कारण असेल तर छत्री, टोपी, गॉगल्स आणि पुरेसे पाणी सोबत ठेवावे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांच्या नोंदींमध्ये एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान 42 अंशांपेक्षा जास्त फक्त पाच वेळा गेले आहे. त्यामुळे यंदाची उष्णतेची लाट ही तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर मानली जात आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 18 एप्रिलपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पुण्यातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, 18 ते 19 एप्रिलनंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
सध्या पुणेकरांनी जास्तीत जास्त पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या वेळेत घरातच राहणे हेच सुरक्षित ठरेल. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या काळात नागरिकांना आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तसेच चार दिवसांनी म्हणजे 19 एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 19 एप्रिलला तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




