मुंबई: लोकल ट्रेनमधील खळबळजनक हत्याकांड; पोलिसांच्या तपासात मोठा ट्विस्ट, व्हायरल व्हिडिओमुळे सापडला हत्येचा शस्त्रसाठा

मुंबई: लोकल ट्रेनमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन हत्याकांडांनंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकांवर आणि पादचारी पुलांवर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. अशातच बोरिवली रेल्वे स्थानकावर तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडे तब्बल 35 सेंटीमीटर लांबीचा चाकू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास बोरिवली लोहमार्ग पोलिसांचे पथक बोरिवली रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक पुलावर प्रवाशांची तपासणी करत होते. यावेळी मच्छिन्द्रनाथ शंकर पाटील (वय 35, रा. कांदिवली पूर्व) याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे 35 सेंटीमीटर लांबीचा धार नसलेला चाकू आढळून आला. पोलिसांनी तत्काळ तो जप्त केला. प्राथमिक चौकशीत संबंधिताने हा चाकू राजस्थानमधून खरेदी केल्याची माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधिताला नोटीस बजावून सोडण्यात आले.

लोकल ट्रेनमधील अलीकडील गंभीर घटनांनंतरही काही प्रवासी शस्त्रे घेऊन प्रवास करत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी स्थानकांवरील तपासणी आणखी कडक केली असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांनी असे घातक आणि धोकादायक शस्त्र सोबत बाळगून आहे आवाहन देखील लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले. सुतार गवंडी आणि इलेक्ट्रिशन यांनी देखील आपली धारदार शस्त्र व्यवस्थित बंदिस्त करूनच प्रवास करावा असे आवाहन बोरवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी केले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *