हिंगोली: कळमनुरीत कयाधू नदीला महापूर; सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ६ गावांचा संपर्क तुटला, शेकडो हेक्टरमधील पिके पाण्याखाली

हिंगोली: कळमनुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या पावसामुळे हिंगोलीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे. संततधार पावसामुळे हिंगोली आणि कळमनुरी परिसरातील नदी-नाल्यांना पूर आले असून जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे.

कयाधू नदीच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे कळमनुरी तालुक्यातील सुमारे ६ गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या गावांकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आणि पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे या भागातील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे, तर प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे, या मुसळधार पावसामुळे आणि कयाधू नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर हँगामी पिके पाण्याखाली गेली आहेत. काढणीला आलेली किंवा वाढीच्या टप्प्यात असलेली उभी पिके पूर्णपणे सडली असून, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटत सापडला आहे. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सतत नजर ठेवली जात असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश लवकरच दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *