सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. हीच बारावीची परीक्षा देण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहपा रोडवर ही घटना घडली. उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी पुलाजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मोहपा गावातील रहिवासी सुभाष केशव भिवणकर हे गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास आपली मुलगी तन्वी सुभाष भिवणकर आणि तिची मैत्रीण वंशिका ज्ञानेश्वर नरुळे यांना दुचाकीने उमरेड येथील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी निघाले होते. बारावीची महत्त्वाची परीक्षा असल्याने तिघेही वेळेत पोहोचण्याच्या तयारीत होते. मात्र, एमआयडीसी पुलाजवळ समोरून येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात सुभाष भिवणकर आणि त्यांची मुलगी तन्वी यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थिनी वंशिका नरुळे ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागरिकांचा संताप आणि तणाव
या अपघाताची बातमी समजताच मोहपा आणि आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतापलेल्या जमावाने ट्रक चालक प्रफुल दशरथ भोयर याला पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर संतप्त नागरिकांनी ट्रकच्या केबिनला आग लावून आपला रोष व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तातडीने धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. यावेळी संतप्त जमावाने पोलीस वाहनावरही दगडफेक केली, ज्यात वाहनाचे नुकसान झाले आहे.
सध्या या परिसरात परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. उमरेड पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका गुणवंत विद्यार्थिनीचा परीक्षेच्या दिवशीच असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
[embedded content]
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




