साताऱ्यातील ५ हजार ५७८ शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची OTS यादी जाहीर; ३१ मार्च २०२७ पूर्वी हिश्श्याची रक्कम भरण्याचे आवाहन!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) योजनेसाठी सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कर्जबाजारीपणाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम व पात्र यादी जाहीर झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१,०५७ गावांतील याद्या बँका, सोसायट्या व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध:

सातारा जिल्ह्यातील १ हजार ५७ गावांमधील या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था (वि.का.से. संस्था) आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गावपातळीवर आणि बँक स्तरावर या याद्या सहज पाहता याव्यात, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना आपले नाव व तपशील तपासून पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येईल.

३१ मार्च २०२७ पर्यंत हिश्श्याची रक्कम भरण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन:

पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील आपले नाव व सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून घ्यावेत आणि आपल्या हिश्श्याची रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत जमा करावी, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे. विहित मुदतीत हिश्श्याची रक्कम भरल्यास योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यास मदत होणार असल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *