कोल्हापूर: शासकीय आरोग्य सेवेत ऐतिहासिक कामगिरी करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील हृदयरोग विभागाने ११ 'टावी' (TAVI) शस्त्रक्रिया यशस्वी करून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडल्याने सामान्य आणि गरजू रुग्णांसाठी मोठा आधार निर्माण झाला आहे.
नुकतीच जयसिंगपूर येथील ८६ वर्षीय पुरुष आणि कोल्हापूर येथील ७७ वर्षीय महिला रुग्णांवर एकाच दिवशी ही यशस्वी टावी शस्त्रक्रिया करण्यात आली. या दोन्ही रुग्णांना श्वास लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, पायावर सूज येणे यांसह उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा तीव्र त्रास होता. त्यांचे वाढलेले वय आणि पारंपरिक 'ओपन हार्ट सर्जरी'साठी असलेला मोठा धोका लक्षात घेऊन, हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने छाती न उघडता मांडीतील रक्तवाहिनीतून अत्याधुनिक पद्धतीने नवीन हृदय झडप (व्हॉल्व्ह) बसवली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्ण दुसऱ्याच दिवशी चालायला लागले आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक हृदयशस्त्रक्रियांसाठी सीपीआरमधील हृदयरोग विभाग आता विशेष ओळखला जात आहे. या विभागात दर महिन्याला सरासरी १५० ते २०० विविध हृदयशस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी, टावी, पेसमेकर, डिव्हाईस क्लोजरपासून ते न्यूरो आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर इंटरव्हेंशनपर्यंतच्या सर्वात गंभीर रुग्णांवर या ठिकाणी उत्कृष्ट उपचार केले जातात. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील 'डीएम कार्डिओलॉजी' या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही येथे दिले जाते.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक
राज्यातील सर्वाधिक टावी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने आणि उपअधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांनी हृदयरोग विभागाच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
या वैद्यकीय पथकाची सामूहिक कामगिरी
या यशस्वी शस्त्रक्रियांमध्ये विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्यासह डॉ. स्फूर्ती जाधव, डॉ. अजित हांगे, डॉ. आदिब शेख, डॉ. निखिल गदाडे, डॉ. सोमेश चौगुले, डॉ. सम्यक भिवगडे, डॉ. गणेश कामत, डॉ. हेमलता देसाई, डॉ. मजीद मुल्ला, डॉ. किशोर देवरे, योजनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सईदेवी सरदेसाई, डॉ. मनाली माने यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे, वैष्णवी सावंत, नर्सिंग विभाग प्रमुख मधुरा जावडेकर, अमृता कराडे, पल्लवी खाडे, रवींद्र भंडारी, संदेश ताम्हाणे, शुभांगी जाधव, स्वाती शेळके, रेखा पाटील, सुरेखा गावडे आणि दीपा माळी यांच्यासह प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




