11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

काळ थांबत नाही. काळाचा नियम आहे. जीव-अजीव वस्तूंच्या परिवर्तनासाठी काळ हा कारणीभूत असतो. काळ थांबणार नाही, त्याला रोकता येणार नाही. काळाच्या गतीनेच दिवसेंदिवस वय वाढत जातं आणि आयुष्याचा अखेरचा टप्पा वार्धक्य म्हटलं जातं एक दिवस तो आपल्यासमोर येऊन ठेपतो. तर हे वार्धक्य,याला म्हातारपण समजलं तर माणूस मनानेही वयस्कर होऊन जातो.
एक शारीरिक वय असतं आणि एक मानसिक वय असतं. शारीरिक वय वाढत जाणारच परंतु मानसिक वय वाढू नये. वयानुसार योग्य ती परिणाम बुद्धी आणि मानसिक समज यायलाच हवी. वयानुसार समजदारी यावी ही अपेक्षा असतेच.
वय वाढत जातं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अवयव क्षीण होत जातात. म्हणजेच शारीरिक क्षमता कमी होत जाते. परंतु सुरुवाती पासूनच व्यायाम आणि खाण्या पिण्यावर नियंत्रण असेल तर हा त्रास कमी जाणवतो. या सोबतच मनाची प्रफुल्लता ही असायला हवी. आपलं वय असणं आणि आपण दिसणं हे आपल्यावर अवलंबून आहे. एखादा पन्नास पंचावन्न वर्षांचा व्यक्ती जेव्हा तरुण मुलांना शारीरिक चपळतेने, दिसण्याने अस्तित्वाने लाजवतो तेव्हा हे लक्षात येतं. वाढत्या वयानुसार आपण आपल्या दिसण्याकडेही थोडंसं लक्ष द्यावं. त्यासाठी आवश्यक त्या आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करावा. शरीर चेहरा, त्वचा याकडे जरासं लक्ष दिलं तर जगण्यात ताजेपणा राहतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट मानसिकता ही आहे. आपण आयुष्यभरात कोणाशी कसे वागलो, कसे संबंध ठेवले यावर अवलंबून आहे की पुढे आपल्याशी कुटुंबातील समाजातील आणि सर्वच लोक कसे संबंध ठेवणार. आपण प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीला सकारात्मकपणे प्रतिसाद दिला तर सर्वांसोबत आपले दिवस हसून खेळून मजेत जातात. आणि मग वाढतं वय लक्षातही येत नाही. काळजी, जिम्मेदारी या गोष्टी सर्वांनाच असतात. आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये प्लॅनिंग ही खूप महत्त्वाचं असतं. दररोजच्या जीवनात आपण सर्वांना कुटुंबामध्ये समजून आणि सांभाळून घेतले असेल तर वाढत्या वयात आपल्याला तेही सांभाळून घेतीलच यात शंका नाही. यासह सहनशीलता आणि संयम ही असला पाहिजे.
तसेच आपण आपले छंदही जोपासले पाहिजेत. प्रत्येकामध्ये कोणती न कोणती कला असते. आपली आवड आपण जाणून जोपासली पाहिजे. दररोजचे फिरणे, व्यायाम, आपल्या आवडीच्या गोष्टी अवश्य कराव्यात, जवळपास असलेल्या एखाद्या उद्यानामध्ये फेरफटका मारावा. निसर्ग, पाने-फुले, झाडं यांच्याकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने पहावे, निसर्ग आणि ईश्वर द्वारा निर्मित कोणताही जीव-अजीव सुंदरच आहे, कदापि असुंदर, कुरूप नाही अशी मानसिक धारणा असावी.
वाचन करावे, वर्तमानपत्र असो, आवडीची पुस्तक असोत, आपला वेळ घालवण्यासाठी वाचन आवश्यकच आणि त्याने ज्ञानही वाढत जाते. आपला मित्र परिवार सांभाळावा मित्र असावेत. मित्रांशी दररोज बोललं पाहिजे. आपल्या मध्ये काही कलागुण असतील तर तेही जोपासले पाहिजेत. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपले कलागुण, आपल्या आवडी-निवडी आपली समजदारी आणि आपला स्वभाव हेच आपल्याला तारते.
म्हणूनच एखादा वयस्कर ही तरुण असू शकतो आणि एखादा तरुणही वयस्कर वाटू लागतो. भलेही माणूस वयस्कर असो तो सर्वांना हवाहवासा वाटला पाहिजे. आपला कंटाळा येऊ नये असेच आपण सर्वांशी वागले पाहिजे. तरच आपलं वार्धक्यही आपल्याला जाणवत नाही आणि हाच काळ आणि वार्धक्य अवस्थेवर विजय प्राप्त झाला असे म्हणता येईल. शरीर भलेही क्षीण होवो , वय भले ही वाढत जावो, मानसिकता तरुण असावी.
(बलराज संघई, 9420015108 | वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
This post was originally published on this site.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




