भारतात स्वयंपाकघराला अनेकदा घराचे ‘हृदय’ म्हटलेजाते. परंतु, यामागे एक अस्वस्थ करणारे सत्यही दडलेलेआहे-आपले स्वयंपाकघर हे सहसा घरातील सर्वात प्रदूषितठिकाणांपैकी एक असते. आज जेव्हा पश्चिम आशियातीलसंघर्ष व तेल-गॅसच्या अनिश्चित पुरवठ्याने जागतिकऊर्जा बाजार अस्थिर आहे तेव्हा भारताला आपण कशाप्रकारे अन्न शिजवतो यावर पुनर्विचार करावा लागेल.भारतीय स्वयंपाकघरे टप्प्याटप्प्याने वीज आधारितबनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन योजनेचा आता गांभीर्यानेविचार करणे आवश्यक आहे. दशकांपासून स्वयंपाकामुळे होणारे घरातील हवेचे प्रदूषणकोट्यवधी लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जैवइंधनावरचालणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षितमर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. शहरी मध्यमवर्गीयघरांमध्येही परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित नाही. तिथे घरातीलहवेची गुणवत्ता अनेकदा बाहेरच्या हवेपेक्षा पाच ते दहा पटीनेखराब असल्याचे आढळले आहे. भारतीय घरांमध्ये खराबहवेची दुहेरी समस्या आहे. इंधनाचा प्रकार व स्वयंपाकाचीपद्धत. मोठ्या ज्वाळा, तेल आणि मसाल्यांतून निघणारा धूरयामुळे हे ठिकाण प्रदूषणाचे केंद्र बनते. संशोधनानुसार, स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्याप्रदूषणाचा संबंध दमा, फुप्फुसांचे जुनाट आजार,हृदयविकार, मोतीबिंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या समस्यातसेच अकाली मृत्यूशी आहे. महिला, ज्या स्वयंपाकघरातजास्त वेळ घालवतात आणि लहान मुले, जी अनेकदामातांच्या जवळ असतात, त्यांना याचा सर्वाधिक फटकाबसतो. भारताने या दिशेने काही महत्त्वाची पावलेउचलली आहेत. गॅसच्या विस्तारामुळे अनेक घरांमध्येलाकूड-कोळशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळेमहिलांना दिलासा मिळाला आणि धूरही कमी झाला. परंतु,गॅस हा अंतिम उपाय नाही. हे अजूनही जीवाश्म इंधनचआहे, ज्याची किंमत आणि उपलब्धता जागतिकपरिस्थितीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत वीज आधारित स्वयंपाकघर हा एकअधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतो.हे खरे आहे की, सध्या भारत सरकार आणि बहुतांश कुटुंबेमोठ्या प्रमाणावर विजेवर आधारित स्वयंपाकासाठी पूर्णपणेतयार नाहीत, परंतु या विचाराला धोरण आणि सार्वजनिकचर्चेत स्थान देणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या बदलालाप्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो. विजेवरील स्वयंपाक हा गॅसच्या तुलनेत अधिकऊर्जा-कार्यक्षम असतो आणि यामध्ये ऊर्जेचा मोठा भागथेट भांड्यापर्यंत पोहोचतो. जसा भारत सौर आणि पवनऊर्जेचा विस्तार करत आहे तसा विजेचा खर्च अधिक स्थिरआणि स्पर्धात्मक होऊ शकतो. हे ऊर्जा सुरक्षा आणिपर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तथापि,यामध्ये अनेक आव्हानेही आहेत. देशाच्या अनेक भागांतविजेचा पुरवठा अद्याप पूर्णपणे विश्वासार्ह नाही. फक्तकनेक्शन असणे पुरेसे नाही, तर निरंतर आणि पुरेशी वीजहीआवश्यक आहे. याशिवाय इंडक्शन शेगड्या आणि इतरउपकरणांचा सुरुवातीचा खर्च गरीब कुटुंबांसाठी अडथळाठरू शकतो. भारतीय जेवणामध्ये मोठ्या ज्वाळा, दीर्घकाळ शिजवणेआणि मोठ्या भांड्यांचा वापर यांचा समावेश असतो.अनेकांना वाटते की इलेक्ट्रिक शेगडीवर तीच चव मिळणारनाही. या धारणा बदलण्यासाठी जागरूकता आणि विश्वासनिर्माण करणे आवश्यक आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठीस्पष्ट धोरणात्मक आराखड्याची गरज असेल. लक्ष्यितसवलती आणि सोप्या आर्थिक पर्यायांद्वारे गरीब कुटुंबांनामदत केली जाऊ शकते. घराच्या छतावरील सौरऊर्जायंत्रणेसारखी व्यवस्थादेखील विजेवरील स्वयंपाकाला बळदेऊ शकते . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel





Sign up for our affiliate program and watch your earnings grow!