‘इफ देअर आर फॅट कॅट्स इन युअर कॉलनी, यू नीड टू चेक युअर ड्रेनेज सिस्टिम’ - हे एक रूपक आहे, जे मुथुस्वामी नारायण यांनी त्यांच्या ‘सक्सेस थ्रू ऑपोझिट्स’ या पुस्तकात वापरले आहे. येथे ‘फॅट कॅट्स’ अशा लोकांसाठी वापरले आहे, जे यंत्रणेचा फायदा घेऊन कोणतेही योगदान न देता किंवा संसाधनांचा अतिवापर करून गब्बर म्हणजेच श्रीमंत होत आहेत आणि दुसरीकडे सामान्य लोक मात्र संघर्ष करत आहेत. तर ‘ड्रेनेज यंत्रणा’ हे अशा पायाभूत सुविधा, प्रक्रिया, नियम किंवा व्यवस्थापनाचे प्रतीक आहे, ज्यावर एखादी संस्था किंवा समुदाय चालतो. 2004 मध्ये मी माझ्या कॉलनीत हे रूपक अनुभवले. आम्ही उंदरांना आत येण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण ड्रेनेज यंत्रणा कडप्पा दगडाने दुरुस्त केली, तेव्हा मांजरीही अन्नाच्या शोधात दुसरीकडे गेल्या अन् तेथून बेपत्ता झाल्या. मला हे रूपक नुकतेच एका शैक्षणिक संस्थेच्या भेटीत आठवले, जिथे बहुतांश वर्गांचे गॅजेट्स असलेल्या स्मार्ट क्लासरूममध्ये रूपांतर करण्यात आले होते, पण गणित आणि वाचन क्षमतेत त्यांचा स्कोअर कमी होता. संशोधनात असे दिसले की, अति-स्मार्ट क्लास आणि गणित तसेच शब्द लक्षात ठेवण्याच्या क्षमतेतील घट यांचा थेट संबंध आहे. खरे तर, जेव्हा एखादे मूल स्क्रीनच्या माध्यमातून ज्ञान किंवा कथा अनुभवते, तेव्हा उजव्या टेम्पोरोपॅरिएटल जंक्शनसारख्या मेंदूच्या भागांमधील सक्रियता कमी होते. पुस्तक वाचताना मेंदूचा हाच भाग सक्रिय असतो, जिथे भाषा आणि साक्षरतेचा पाया तयार होतो. जेव्हा स्मार्ट स्क्रीनच्या माध्यमातून सोपा मार्ग मिळतो, तेव्हा मेंदूही ‘फॅट कॅट’प्रमाणे सोपा मार्ग निवडतो. ‘स्मार्ट क्लास’चा उद्देश शिक्षकांना एक अतिरिक्त संसाधन देणे हा होता, जेणेकरून ते वर्ग आकर्षक, जिवंत आणि संवादात्मक बनवू शकतील आणि मुलांना विषय लवकर समजेल. पण शैक्षणिक साहित्यासाठी शिक्षकांच्या गुगलवरील अति-अवलंबनामुळे शालेय मुलांना प्रत्येक लहान गोष्टीसाठी व्हिडिओ स्क्रोल करण्याची सवय लागली आहे. इकडे, घरात पालक त्यांच्या मुलांसाठी शॉर्ट्स कंटेंट ब्लॉक करू शकतात, ज्यामुळे मुले काय पाहतात यावर त्यांचे नियंत्रण राहते. तरीही चोवीस तास इंटरनेटशी जोडलेल्या ‘स्मार्ट होम्स’’’’मध्ये मुले होमवर्कच्या दबावामुळे किंवा इतर कारणांमुळे पूर्वीपेक्षा जास्त व्हिडिओ पाहत आहेत. या सुविधेमुळे मुले मॉनिटरला चिकटतात आणि बेडरूममधूनच वर्क फ्रॉम होम आणि इतर कामे करणाऱ्या पालकांना त्रास देत नाहीत. दोन्ही प्रकरणांत भारतात अशी कोणतीही यंत्रणा नाही, जी मुले दररोज किती व्हिडिओ पाहतात यावर लक्ष ठेवेल. मी एका अमेरिकन वृत्तपत्रात वाचले की, 7 वीच्या एका मुलाने डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 13 हजार व्हिडिओ पाहिले. यात असे गेम्स होते, जे खेळण्याची परवानगी नव्हती. 10वीच्या एका विद्यार्थ्याने 2 तास 40 मिनिटांत 200 कंटेंट पाहिले. दुसऱ्या इयत्तेतील एका विद्यार्थ्याने तर आश्चर्यकारकपणे दोन महिन्यांत 700 व्हिडिओ पाहिले. थक्क करणारी ही आकडेवारी अशा विकसित देशांतील आहे, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे गॅजेट्स आहेत. मुलांमध्ये सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया कोणता आहे, असा विचार करत आहात? अर्थातच - यूट्यूब, बीबीसीसारख्या माध्यम संस्थाही तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे न्यूज ब्रॉडकास्ट यूट्यूबवर देत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही व्हिडिओसाठी मुलांमध्ये यूट्यूब हे सर्वात आवडते सर्च इंजिन बनले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांचा फ्रंटल लोब वेगाने काम करावा, त्यांचा एकाग्रतेचा वेळ वाढावा आणि मेंदूचे व्हिज्युअल लँग्वेज प्रोसेसिंग क्षेत्र मजबूत व्हावे, तर त्यांच्या दिनचर्येत स्क्रीन टाइमऐवजी पुस्तकांचा समावेश करा. फंडा असा की, मुलांमधील सोशल मीडियाच्या व्यसनासाठी कुणाला जबाबदार धरावे, शाळा की पालक? सध्या याचे स्पष्ट उत्तर नाही. पारडे कोणत्याही बाजूला झुकले, म्हणजेच जास्त व्हिडिओ स्मार्ट क्लासमध्ये असोत किंवा स्मार्ट होम्समध्ये, सरतेशेवटी याचा वाईट परिणाम भावी पिढीवरच होणार आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




