
New Delhi : ‘केंद्र सरकारने देशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली असून, नौदलासाठी २६ राफेल विमानांच्या खरेदीचा आणि तीन स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे,’ अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सोमवारी दिली.
४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अॅडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले, की सरकारने अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुडी निर्मितीसाठी (एसएसएन) मंजुरी दिली आहे. ‘एसएसएन’मुळे नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होईल. अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी २०३६-३७ पर्यंत, तर दुसरी पाणबुडी त्यापुढील दोन वर्षांत तयार होईल. ‘नौदलासाठी असणारी राफेल लढाऊ विमानांची आवृत्ती ‘राफेल मरिन’ खरेदीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
पाकिस्तानी नौदलाबद्दल आश्चर्य
आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही पाकिस्तानी नौदलाच्या वाढत्या हालचालींबद्दल नौदलप्रमुखांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की ‘पुढील दशकापर्यंत पाकिस्तानी नौदलाचे ५० युद्धनौकांचे नौदल बनण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांची आर्थिक स्थिती पाहता एवढ्या नौका आणि पाणबुड्या ते कशा उभारतात, हे आश्चर्यच आहे. जनकल्याणाऐवजी त्यांनी शस्त्राला प्राधान्य दिल्याचे उघड आहे. पाकिस्तानच्या अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या चीनच्या सहकार्याने तयार केल्या जातात.’
नौदलप्रमुखांच्या वक्तव्यांतील ठळक मुद्दे
● भारताच्या विविध जहाजबांधणी कारखान्यांत ६२ युद्धनौका आणि एका पाणबुडीची बांधणी सुरू
● देशी बनावटीच्या ३१ नौका आणि पाणबुडी बांधणी प्रकल्पाचे सुरुवातीचे प्रस्ताव मान्य ● नौदलासाठी ६० युटिलिटी हेलिकॉप्टरच्या खरेदीस सरकारची मान्यता
शहर
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
- मुंबई: पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक'वर भीषण काळ फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; २ तास वाहतूक ठप्प.
महाराष्ट्र
- मालेगाव: आरोग्य सेवा विस्कळीत; खाजगी डॉक्टरांच्या संपामुळे तिसऱ्या दिवशी १५० हून अधिक शस्त्रक्रिया लांबणीवर.
- निसर्गसौंदर्याने नटलेले शिरदाळे गाव ठरतेय पर्यटकांचे आवडते ठिकाण; शेकडो राष्ट्रीय पक्षी मोरांच्या थव्यांमुळे परिसर बहरला, पण शेतकऱ्यांसमोर चिंतेचे संकट
- कोल्हापूर: सोशल मीडियाची स्टंटबाजी पडली महागात; मसाई पठारावर हुल्लडबाजी करून वनस्पतींची नासधूस करणाऱ्या ५ तरुणांना वन विभागाचा दणका.
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
गुन्हा
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- छत्रपती संभाजीनगर: शाळेत रक्ताचा थरार! क्षुल्लक वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर चाकूने हल्ला; एक जण गंभीर जखमी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी

























Subscribe to my channel




