
Mumbai : राज्यात मागील काही महिन्यांपासून ज्या निवडणुकांची प्रतीक्षा होती त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आजपासून सदर जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच मजमोजणी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (ZP & Panchayat Samiti Election) १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छानणी २२ जानेवारी रोजी होईल आणि उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप- २७ जानेवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर होईल.
|
Pune Crime : मैत्रिणीच्या घरी मेजवानी, बोलता बोलता विषय भरकटला; कोंढव्यात थरारक घटना! |
दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या इतर २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर घेण्यात येणार आहेत.
राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या पुणेजिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीची तयारी करा, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवून आदेश दिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
- दुबार मतदार आम्ही निश्चित केले असून त्याबाबतची कार्यवाही अधिकारी करतील.
- मताधिकार मोबाईलअॅपद्वारे मतदाराला त्याला त्याचा निवडणूक विभाग, मतदान केंद्र शोधता येईल
- मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवरही त्याचं नाव टाकून त्याचे मतदान केंद्र शोधता येईल
- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर आणि तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रियांना मतदानावेळी प्राधान्य देण्यात येईल
- १२ जिल्हा परिषदांमधून ७३१ सदस्य निवडून दिले जातील
- १२५ पंचायत समित्यांमधून १ हजार ४६२ सदस्य निवडून दिले जातील
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकाअंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांना होती. दरम्यान, निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, राज्यातील २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर येत्या २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मुदतवाढ मागितली होती. त्यावर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. त्यानंतर आज ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असणारे १२ जिल्हे असून त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका या निर्भय, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





https://shorturl.fm/y8m3D