राष्ट्र गान ‘जन गण मन’ प्रमाणे आता राष्ट्र गीत ‘वंदे मातरम्’ सुद्धा सरकारी कार्यक्रमात वाजवणं आणि गाणं अनिवार्य केलं आहे. राष्ट्रगीत वंदे मातरम आणि राष्ट्रगान जन गण मन एकत्र गायलं किंवा वाजवलं जात असेल तर वंदे मातरम् पहिलं वाजवलं जाईल. इतकच नाही, तर गायन आणि वादनाच्या वेळी श्रोत्यांना सावधन मुद्रेतच उभं रहावं लागेल. सहाकडवी असलेल्या 3 मिनिट 10 सेकंदांच्या वंदे मातरम् चे गायन करावे लागणार आहे. याआधी वंदे मातरम् ची दोन कडवी गायली जात होती. तिरंगा फडकवताना, सरकारी कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या आगमनावेळी, त्यांच्या भाषणावेळी, देशाला संबोधित करण्याच्या आधी आणि नंतर. सोबतच राज्यपालांच आगमन आणि त्यांच्या भाषणाआधी आणि नंतर, वंदे मातरम् संबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्देश दिले आहेत.
न्यूज रील किंवा डॉक्यूमेंट्री दरम्यान राष्ट्र गीत कुठल्या चित्रपटाचा भाग म्हणून दाखवलं जात असेल तर प्रेक्षकांकडून उभं राहण्याची अपेक्षा नसेल. कारण प्रेक्षक उभे राहिल्यास फिल्मच्या प्रदर्शनात बाधा येईल तसचं राष्ट्रगीताचा मान वाढण्याऐवजी अव्यवस्था आणि भ्रम अशी स्थिती निर्माण होईल.
हे निर्देश इंग्रजी आणि हिंदीमध्ये सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात, मंत्रालय तसेच संवैधानिक संस्थांमध्ये जारी करण्यात आले आहेत.
आतापर्यंत ‘वंदे मातरम्’च्या गायना दरम्यान कुठलाही अधिकृत प्रोटोकॉल नव्हता. पण ‘जन गण मन’साठी स्पष्ट नियम होते. सहाकडव्यांचं‘वंदे मातरम्’ अजूनपर्यंत अधिकृत कार्यक्रमात गाण्यात आलेलं नाही. पण आता हे अनिवार्य केलं आहे. राष्ट्रगीत कुठल्या-कुठल्या प्रसंगात गायचं किंवा वाजवायचं त्या कार्यक्रमांचं तीन कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे.
नव्या व्यवस्थेतंर्गत राष्ट्र गीत बँडद्वारे वाजवलं जात असेल, तर त्याआधी ढोल थाप ड्रम रोल दिला जाईल. जेणेकरुन श्रोत्यांना संकेत मिळेल की राष्ट्रगीत वाजवलं जाणार आहे.
शाळेसाठी काय नियम?
आदेशानुसार, सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने करता येऊ शकते. तसचं विद्यालय व्यवस्थापनाने राष्ट्र गीत आणि राष्ट्र गान लोकप्रिय करण्यासाठी तसच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ध्वजाप्रती सन्मानाची भावना विकसित करण्यासाठी पर्याप्त व्यवस्था करावी. औपचारिक नसलेल्या प्रसंगी सुद्धा तुम्ही राष्ट्र गीत गाऊ शकता. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ 150 वर्ष साजरी केली जात आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



