सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विट्याजवळील रेणावी घाटामध्ये झालेल्या दोन एसटी बसच्या भीषण समोरासमोरच्या धडकेतील मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. उपचारादरम्यान १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अपघाताची दखल घेत राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे, तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे.
घटनाक्रमाची सविस्तर माहिती अशी की, विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्या जवळच्या रेणावी घातात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विटा आगाराची विटा ते भिवघाट जाणारी बस आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा जाणारी बस यांच्यात रेणावी घाटाच्या चढणीवर तीव्र स्वरूपाची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेच्या सुरुवातीच्या धक्क्यातच खानापूर येथील नंदाबाई हरिदास त्रंबके (वय ६०) आणि बांबवडे (ता. खानापूर/जि. सातारा) येथील धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८) हे दोघे प्रवासी जागीच ठार झाले होते.
या अपघातात बसमधील ३८ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर घाटातील अंधार, मोबाइल नेटवर्कची अनुपलब्धता आणि तीव्र वळणे यामुळे सुरुवातीला मदतकार्यात काही प्रमाणात अडथळे आले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेऊन जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले आणि उपचारासाठी विट्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात गंभीर जखमी झालेली १७ वर्षीय तरुणी साक्षी चंद्रकांत पवार (रा. ऐनवाडी, ता. खानापूर) हिच्यावर विट्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. साक्षी ही बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे या अपघातातील बळींची संख्या वाढून तीन झाली आहे. तिच्या अकाली जाण्याने ऐनवाडी गावावर आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघाताची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय जखमी प्रवाशांना योग्य उपचार मिळावेत यासाठी सर्व उपचाराचा खर्च राज्य शासनाकडून केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. घाटातील वाहतुकीचे नियम आणि एसटी बसच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याबाबत नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
महाराष्ट्र
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- कोल्हापूर: कोगनोळी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन ३० तासांनंतर स्थगित; राजू शेट्टींचा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




