सिंधुदुर्ग: सावंतवाडीतून एक अत्यंत दुःखद आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले माजगाव-कुंभारवाडी येथील ४८ वर्षीय महेश लक्ष्मण पेडणेकर यांचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्याच संशयास्पद स्थितीत आढळला. मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेले महेश पेडणेकर अचानक रहस्यमयी रीतीने मृत अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय असावे, याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे.
नेमकी घटना कशी घडली? प्राप्त माहितीनुसार, महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८, रा. माजगाव-कुंभारवाडी, ता. सावंतवाडी) हे १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मित्र यशवंत उर्फ योगेश विष्णू परब (रा. चराठा) यांच्यासोबत मासे पकडण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते दोघे तेरेखोल परिसर व मळगाव घाटीच्या दिशेने गेले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत आणि रात्री उशिरापर्यंतही महेश घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईकांकडे व परिसरामध्ये बरीच शोधाशोध केली, परंतु त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही, तसेच त्यांचा मोबाईल फोन देखील बंद येत होता.
पत्नीची पोलिसांत तक्रार आणि शोध मोहीम: पती घरी न परतल्यामुळे चिंतेत पडलेल्या त्यांच्या पत्नी मिनल महेश पेडणेकर (वय ४०) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याबाबतची अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी नापत्ता नोंद करून त्यांचा शोध सुरू केला होता. यादरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, नातेवाईक आणि त्यांचे भाऊ रूपेश पेडणेकर हे देखील त्यांचा कसून शोध घेत होते.
धबधब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ: शोध घेत असताना बुधवारी सकाळी मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालील बाजूस पाण्याच्या प्रवाहात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना व संशयास्पद स्थितीत आढळला. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून ताब्यात घेतला. प्राथमिक तपासणीत मृत व्यक्ती महेश पेडणेकर असल्याचे निष्पन्न झाले.
मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू: मित्रासोबत गेलेल्या महेश यांचा मृत्यू नक्की कसा झाला? ते पाय घसरून धबधब्यात किंवा दरीत पडले की यामागे काही घातपात आहे, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासातूनच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असून, सावंतवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




