कोल्हापूर: जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. यंदाच्या उसाच्या हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन ४,५०० ते ५,००० रुपये मिळावी, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या थेट नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री आणि साखर कारखानदार यांच्यासोबत झालेल्या विविध टप्प्यांतील बैठका पूर्णपणे निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी किणी गावातील ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात दर्शन घेऊन माजी खासदार राजू शेट्टी हे स्वतः आंदोलक शेतकऱ्यांसह किणी टोलनाक्यावर दाखल झाले. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत नाही आणि कारखानदारांकडून होणारी पिळवणूक थांबत नाही, तोपर्यंत महामार्ग रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा कडक इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
आंदोलनाची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने किणी टोलनाका परिसरात ३०० हून अधिक पोलिसांचा मोठा ताफा आणि कडक बंदोबस्त तैनात केला आहे. महामार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शिरोळ पोलिसांनी राजू शेट्टी यांना आधीच नोटीस बजावली होती. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पुण्याकडून येणारी वाहतूक वाठार फाटा मार्गे, तर कोल्हापूरकडून येणारी वाहने अंतर्गत ग्रामीण पर्यायी मार्गाने वळवण्यास सुरुवात केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत कारखानदार आणि शासन उसाला प्रतिटन ४,५०० रुपयांची पहिली उचल जाहीर करत नाहीत, तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मुक्काम ठोकण्याची तयारी केली असून, या आंदोलनामुळे साखर कारखानदारांवर आणि राज्य प्रशासनाविरोधात मोठा दबाव निर्माण झाला आहे.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



