
Parbhani : कीर्तनाहून घराकडे येताना मराठवाड्यातील परभणीत भयंकर अपघात झाला. यामध्ये तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. दत्ता महाराज मुडेकर , माऊली महाराज कदम , प्रसाद महाराज कदम याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मराठवाड्यातील वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे.
परभणी जिंतूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा आज पहाटे अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परभणी जिंतूर महामार्गावर असलेल्या झरी गावाजवळ मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला. दत्ता महाराज, माऊली महाराज आणि प्रसाद महाराज हे क्रीर्तनाहून घराकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. तिन्ही महाराज गावोगावी जाऊन किर्तन अन् प्रवचन देत होते. पण किर्तनाहून घरी येताना काळाने घाला घातला.
|
Nagpur : ऐतिहासिक पाऊल! ‘बोइंग 777’ मेंटेनन्ससाठी अमेरिकेची मंजुरी; नागपूर ठरतंय एव्हिएशन हब |
मयत वारकऱ्यांची नावे -
हभप. माऊली दिगंबरराव कदम (३०), (रा. बोर्डी ता. जिंतूर),
हभप. प्रसादराव कदम (४५, रा. बोर्डी ता. जिंतूर),
हभप. दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर)
हभप. माऊली कदम, हभप. प्रसादराव कदम आणि हभप. दत्ता कराळे हे तिघे परभणीतील पिंपळामधील कीर्तनसाठी गेले होते. गावातील कीर्तन आटोपल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास तिघेही दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले होते. झरी गावाजवळच्या लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येतात काळाने घाला घातला. महाराजांच्या दुचाकीला कारने जोरात धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.
मध्यरात्री अपघाताची माहिती मिळतच पोलिसांनी झरी गावात धाव घेतली. शंकर हाके यांनी तात्काळ या अपघातात तिघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. पण उपचारावेळी तिघांचा मृत्यू झाला. अपघातात वारकऱ्यांचे निधन झाल्याची माहिती कळताच बोर्डी गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel




1 thought on “Parbhani Accident : कीर्तनाहून परतताना भीषण अपघात; ३ वारकरी जागीच ठार, दत्ता महाराज मुडेकरांचे निधन”