
Thackeray Alliance : ठाकरे बंधूंनी अखेर युतीची घोषणा केली आहे. वरळीतील पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा पुढील महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असं राज ठाकरे यांनी यावेळी अगदी ठासून सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल.
ठाकरे बंधू सोबत आल्यानं आता भाजपला त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे. ठाकरे बंधू सोबत आल्याचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदेना होऊ शकतो. ठाकरे बंधू आल्यानं परिस्थिती बदलेल, समीकरणं बदलतील आणि त्यामुळे आम्हाला रणनीतीही बदलावी लागेल, ही बाब भाजपचे अनेक नेते खासगीत मान्य करतात.
|
|
'दुभंगलेली शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद पाहता स्वबळावर लढून मुंबई महापाालिका निवडणूक जिंकता येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं परिस्थिती बदलली आहे. '२०१७ मध्ये शिवसेना एकसंध असताना निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० हून अधिक नगरसेवक आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवणं भाजपला चालणार नाही,' असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.
प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. त्यावरुन ठाकरे बंधूंनी रान पेटवलं. अखेर महायुती सरकारला भाषा सक्तीचा जीआर मागे घ्यावा लागला. त्यावेळी ठाकरे बंधूंनी मराठी भाषेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आणि हाच मुद्दा त्यांना एकत्र घेऊन आला. या मुद्द्याला मराठी जनांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे मराठीचा मुद्दा ठाकरे बंधू खुबीनं वापरु शकतात, याची जाणीव भाजपला आहे. 'मराठी माणसा जागा हो, ही तुझ्या अस्तित्त्वाची शेवटची लढाई आहे,' असं भावनिक आवाहन करणारे बॅनर मुंबईभर लागले आहेत.
ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन बॅटिंग सुरु केल्यावर भाजपलाही मराठीच्या पीचवर उतरावं लागलं. भाजपची सत्ता आल्यास मराठी महापौर करु, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांना जाहीर करावी लागली. शिवसेना उबाठाची सत्ता आल्यास खान आडनावाची व्यक्ती महापौर होईल, असं म्हणणाऱ्या भाजपला ठाकरे बंधूंची युती मराठी माणसाच्या मुद्द्यावर घेऊन आली.
मुंबईत मराठी मतांचं प्रमाण २६ टक्के, तर मुस्लिम आणि दलित मतांचं प्रमाण प्रत्येकी ११ टक्के आहे. मराठी, दलित आणि मुस्लिम हा MDM फॅक्टर ४८ टक्क्यांच्या घरात जातो. ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार उद्धवसेनेकडे वळले. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी ४ जागा लढवत ३ वर बाजी मारली. त्यावेळी ठाकरे काँग्रेस सोबत होते. आता त्यांच्या सोबत काँग्रेस नसली तरी राज यांच्या रुपात मनसेचा मतदार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू अधिकाधिक मराठी मतदारांना आपल्याकडे आणू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व वाढलं आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतांच्या जोडीला अधिकाधिक मराठी मतं मिळवण्यासाठी भाजपला शिंदेसेना महत्त्वाची वाटते.
भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या लढाईत खरी शिवसेना, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आमच्या सोबत आहे, हा संदेश लोकांमध्ये जाणं महत्त्वाचं असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ठाकरे बंधू मराठी मतांसाठी संपूर्ण ताकद पणाला लावतील. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्यास मराठी मतांचं विभाजन भाजपसाठी महत्त्वाचं असेल. अशा परिस्थितीत शिंदेसेनेचं महत्त्व वाढेल. ते अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतील.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




