
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एमआयएमने जबरदस्त मुसंडी मारली आहे. भाजपने ५८ जागा जिंकत एकहाती सत्ता आणली. तर अपेक्षित नसतानाही एमआयएमने तब्बल 33 जागा जिंकल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकली नाही. उलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. आता महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक पक्ष तोही भाजप सत्ता स्थापन करेल. तर एमआयएम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल.
- एकूण जागा 115 :
- भाजप : 58
- शिवसेना : 12
- शिवसेना UBT : 6
- एमआयएम : 33
- काँग्रेस : 1
- राष्ट्रवादी : 0
- राष्ट्रवादी SP : 1
- वंचित बहुजन आघाडी 4
|
|
कोण काय म्हणालं?
सत्ता आणि संपत्ती याचा वापर महापालिकेत झाला. ५ हजार ते १२ हजार रुपये प्रत्येक मताला वाटले. निवडणूक विभाग त्यांच्याकडे आहे. ते काही करणार नाहीत. माझ्याकडे अशी तक्रार आली आहे की अगोदरच मतदान झाले, असे गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला.
भाजपने या शहराला पाणी दिले नाही. या शहराला कर्जाच्या दरीत ढकलले. तरीही भाजपला यश मिळाले. आम्हाला पराभव मान्य आहे, अशा शब्दांत दानवेंनी पराभव स्वीकारला.
महापालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. आम्हाला जनतेचा निर्णय मान्य आहे. उमेदवार द्यायला आमची चूक झाली असेल. अंतर्गत राजकारणाचा आणि बदलीचा फटका आम्हाला बसला आहे. लक्ष केंद्रीत करायला हवं होतं. ते झालं नाही, असे शिरसाट म्हणाले.
भाजपबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले त्याला आम्ही महत्व देत नाही. युती झाली असती तर काय झालं असतं, याला काही अर्थ नाही. भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल यात वाईट काय आहे. इथे नाही तर अनेक ठिकाणी तेच झाले. सत्ता येईलच असे नाही. जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो, असे शिरसाट म्हणाले.
एमआयएमला मिळालेल्या यशानंतर इम्तियाज जलील यांनीही प्रतिक्रिया दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओवैसी यांनाही विश्वास नव्हता की इतक्या जागा मिळतील. पण ३५ जागांवर विजय मिळेल, असा मला विश्वास होता. हैदराबादनंतर छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. लोक म्हणत होते की आता एमआयएम संपत चालला आहे. पण ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी आभार मानतो, असे जलील म्हणाले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel





1 thought on “Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहास! भाजपची एकहाती सत्ता; MIM चा अनपेक्षित उदय, शिंदे गटाला मोठा धक्का”