5 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा सर्वोच्च न्यायालय आपल्याच निर्णयांना वारंवारबदलते तेव्हा तो सार्वजनिक चिंतेचा विषय बनतो. २०२५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले आठ निर्णय फिरवले.अनेक आदेश तर दिल्यानंतर काही आठवड्यांतचबदलले गेले. सर्वोच्च न्यायालयाने भूतकाळात आपल्यानिर्णयात बदल किंवा सुधारणा केली नाही असे नाही,परंतु असे सहसा तेव्हाच घडले होते, जेव्हा एखाद्यापक्षाने प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी मोठ्याखंडपीठाकडे दाद मागितली होती. मात्र, अलीकडीलघडामोडी वेगळ्या आहेत. कारण हे निर्णयन्यायालयाच्या आतूनच फिरवले गेले. दुसऱ्या शब्दांत,सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन ही प्रकरणेइतर खंडपीठांकडे पाठवली, ज्यांनी पहिल्या खंडपीठाचा निर्णय बदलला. विधिज्ञांच्या मते, सर्वोच्च न्यायालयातअसे पहिल्यांदाच घडत आहे. ही पद्धत सुरू राहिली तरती न्यायशास्त्राच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.कारण यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वैधता कमकुवत होईल. ज्या विषयांवरील निर्णय मागे घेण्यात आले त्यामध्ये न्यायालयीन शिस्तीपासून ते पर्यावरणाचे विषय, कॉर्पोरेट मुद्दे आणि भटक्या कुत्र्यांच्याप्रकरणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बदलण्यातआलेल्या आठ निर्णयांपैकी तीन निर्णय न्यायमूर्ती जे. बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिले होते, जे भविष्यातभारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. हे देखील रंजकआहे की, हे निर्णय बदलण्याची सुरुवात निवृत्त न्यायमूर्तीबी.आर. गवई यांच्या कार्यकाळात झाली. विद्यमानसरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यकाळातही हासिलसिला सुरू आहे. अरावली खाणकामाशी संबंधितनिर्णयाचा उलटफेर सर्वात धक्कादायक होता.
तत्कालीन सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखालीलखंडपीठाने २० नोव्हेंबर रोजी खाणकामाच्यानियमनासाठी सरकारी समितीने सुचवलेली उंचीसंबंधीव्याख्या मान्य केली होती. पर्यावरणवादी आणिसामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सरन्यायाधीशसूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यानिर्णयाला स्थगिती दिली आणि या मुद्द्याच्यापुनर्मूल्यांकनासाठी विषयतज्ज्ञांची एक नवीन समितीस्थापन केली. नवीन आदेशात म्हटले आहे की,‘जनभावना’ लक्षात घेऊन आधीच्या निर्णयाचेपुनरावलोकन केले जात आहे. सार्वजनिक विरोधाच्याप्रतिसादात न्यायालयीन पुनरावलोकनाचे पाऊलस्वागतार्ह असले तरी यामुळे आधीचा निर्णय कशाप्रकारे घेतला गेला होता यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.दिल्ली आणि हरियाणाची फुप्फुसे मानल्या जाणाऱ्याअरावली टेकड्यांसाठी सरकारी समितीचीउंची-आधारित व्याख्या स्वीकारण्यापूर्वी मागीलखंडपीठाने पुरेसा विचार केला नव्हता का? की हीस्थगिती केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न होता?
आधीचे निर्णय फिरवण्याच्या वेळेमुळे (टायमिंग) हे गूढअधिकच वाढले आहे. अरावलीतील खाणकामालाहिरवा कंदील दाखवणारा पहिला निर्णय तत्कालीनसरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीच्या अवघ्या तीनदिवस आधी, २० नोव्हेंबर रोजी आला. त्यानंतर पाचआठवड्यांनी २९ डिसेंबर रोजी हा निर्णय फिरवण्यातआला. हिवाळी सुट्टीच्या काळात सरन्यायाधीश सूर्यकांतयांनी यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन केले.न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीहयांच्या खंडपीठाने निर्णय मागे घेण्याच्या या नवीनपद्धतीतील धोक्यांबाबत इशारा दिला होता. हा इशाराअरावलीचा निर्णय बदलण्याच्या अगदी आधी आलाहोता. स्पष्ट आहे की, त्यांच्या सावधगिरीच्याबोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही न्यायाधीशांनीम्हटले होते की, ‘एखाद्या कायदेशीर विषयावरखंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे वाद संपला पाहिजे.कारण तो अंतिम असतो... केवळ नंतर एखादा दुसरादृष्टिकोन अधिक चांगला वाटतो म्हणून एखादा निकालपुन्हा उघडला गेला तर कलम १४१ लागू करण्याचाउद्देशच अपयशी ठरेल... यामुळे न्यायालयाचा अधिकारआणि निकालांचे मूल्य कमकुवत होईल.’ सर्वोच्च न्यायालय सध्या सरकारी दबाव, जनहित आणिसंविधान यांच्यातील एका संतुलित रेषेवर चालत आहे. ( ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत. )

न्यायालयांकडून, विशेषतः सर्वोच्चन्यायालयाकडून अशी अपेक्षा केली जातेकी, कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांनीसर्व कायदेशीर पैलूंचा गांभीर्याने विचारकरावा. एकदा आदेश दिला की तोसर्वमान्य असला पाहिजे.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




