
Mumbai : मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा फटका जगभरातील हवाई वाहतुकीला बसला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारपासून इराणवर संयुक्त लष्करी हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा आज मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या तणावामुळे शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली होती. आज दिवसभरात 444 उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.
मंत्रालयाची माहिती
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबद्दल आज माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. 'ऑपरेशनल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमान कंपन्यांशी जवळून समन्वय साधत आहे', अशी माहिती त्यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.
कालही अनेक उड्डाणे रद्द
काल इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे 28 फेब्रुवारीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एकूण 57 विमान सेवा काल रद्द करण्यात आल्या होत्या. शिवाय युएई ते इस्रायल पर्यंतचे हवाई मार्ग कालपासून बंद करण्यात आले आहेत. यामुळे भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. भारीतय हवाई कंपन्यांनी 2 मार्चपर्यंत या प्रदेशातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे दुबईसह अनेक विमानतळावर नागरिक अडकून पडले आहेत.
शनिवारी मध्य-पूर्वेत पेटलेल्या संघर्षामुळे एकूण 900 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक भारतीय कर्मचारीही येथे अडकले होते. एअर इंडियाने त्यांना यावेळी सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम केलं. शनिवारी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर ठप्प झालेल्या सेवांमध्ये इंडोगोच्या मुंबई-लंडन सेवेचाही समावेश आहे. यामुळे विमानसेवेचं भाडं वाढलं असून, आज, 1 मार्चला, लंडनला जाणाऱ्या थेट तिकिटांची किंमत 1.4 लाख रुपयांवर पोहचली आहे.
आज कशी असेल स्थिती?
एअर इंडियाकडून रविवारी, दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून लंडन, न्यू यॉर्क, नेवार्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणाऱ्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, इंडोगोकडूनही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये जाणारे उड्डाणे आज रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी आपल्या फ्लाइटची स्थिती पाहूनच घराबाहेर पडावे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




