ग्राहक: उत्पादनांच्या वजनात फसवणूक करणाऱ्या मोठ्या कंपन्यांविरोधात ग्राहक न्यायालयाचा किती कठोर वचक असू शकतो, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. एका ग्राहकाने खरेदी केलेल्या सर्फ एक्सेल (Surf Excel) डिटर्जंट पावडरच्या पाकिटावर ९० ग्रॅम वजन छाटलेले असताना, प्रत्यक्षात त्याचे वजन केवळ ७० ग्रॅम भरले. याप्रकरणी तब्बल सहा वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर उत्तराखंड राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने प्रसिद्ध एफएमसीजी कंपनी 'हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड'ला (HUL) दणका दिला असून, कंपनीला एकूण ५० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
सप्टेंबर २०२० मध्ये उत्तराखंडमधील नैनताल जिल्ह्यातील रामनगर येथे राहणारे ज्ञान चंद्र गर्ग यांनी एका स्थानिक दुकानातून ५१२ रुपये देऊन 'सर्फ एक्सेल इझी वॉश' डिटर्जंटच्या पाकिटांचे एक बॉक्स खरेदी केले होते. घरी आल्यावर त्यांनी त्यातील एका पाकिटाची खात्री करण्यासाठी वजन केले. पाकिटावर निव्वळ वजन (Net Weight) ९० ग्रॅम छाटलेले होते, परंतु इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजल्यानंतर त्या पाकिटाचे वजन केवळ ७० ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी संबंधित कंपनीला आणि विक्रेत्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली, परंतु योग्य तो न्याय न मिळाल्यामुळे ज्ञान चंद्र गर्ग यांनी नैनताल येथील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगात अधिकृत तक्रार दाखल केली. जिल्हा ग्राहक आयोगाने सुरुवातीला सर्व युक्तिवाद ऐकून घेत कंपनीला दोषी ठरवले आणि मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीपोटी ५० हजार रुपये, मुकदमेबाजीचा खर्च म्हणून १० हजार रुपये आणि अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल कंपनीवर ५० हजार रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावला होता.
राज्य आयोगाचा अंतिम निर्णय:
जिल्हा आयोगाच्या या निर्णयाविरोधात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले. अपील सुनावणीदरम्यान एक अत्यंत महत्त्वाची पायरी पार पडली, जिथे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्व पक्षांच्या वकिलांच्या उपस्थितीत सीलबंद पाकीट इलेक्ट्रॉनिक किचन स्केलवर प्रत्यक्ष तपासण्यात आले. त्यामध्ये पाकिटाचे वजन ७० ग्रॅमच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आणि कंपनीच्या वकिलांना त्यावर कोणताच आक्षेप घेता आला नाही.
उत्तराखंड राज्य ग्राहक आयोगाच्या न्यायमूर्तींनी (अध्यक्षा कुमकुम राणी आणि सदस्य बी.एस. मनराल) कंपनीचा हा युक्तिवाद फेटाळून लावला की हा मुद्दा केवळ कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्यांतर्गत येतो. तसेच, ग्राहकाने आपले प्रकरण भक्कम पुराव्यांसह सिद्ध केल्याचे स्पष्ट करत, ९० ग्रॅम ऐवजी ७० ग्रॅमचे उत्पादन विकणे ही स्पष्टपणे 'अनुचित व्यापार पद्धत' (Unfair Trade Practice) असल्याचे ताशेरे ओढले.
त, राज्य आयोगाने HUL च्या अपिलावर अंशतः दिलासा देत जिल्हा आयोगाने ठोठावलेला काही दंड व अतिरिक्त आदेश रद्द केले. मानसिक व आर्थिक त्रासापोटी देण्याची रक्कम ५० हजारांवरून कमी करून ४० हजार रुपये केली, तर मुकदमेबाजीचा १० हजार रुपयांचा खर्च कायम ठेवला. अशा प्रकारे, ग्राहकाने अत्यंत लहान प्रमाणावर झालेली फसवणूक असूनही सतत सहा वर्षे लढा देत कंपनीला कायदेशीर जाळ्यात अडकवले आणि न्याय मिळवून दाखवला.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




