फलटण (सातारा) : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेचा आणि जादूटोण्याचा भयानक गैरवापर करत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अंगात भूत शिरल्याची खोटी भीती दाखवली गेली. या भितीचा गैरफायदा घेत नराधमाने जादूटोण्याचा बनाव रचून तिच्यावर वेळोवेळी अकुप्रकार आणि लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात व संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने यासंदर्भात फलटण पोलिसांत जाऊन सविस्तर फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सौरभ नाना मदने याच्याविरोधात अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सुरुवातीला पीडित मुलीच्या मनात अंगात भूत आल्याची किंवा वाईट शक्तींचा वास असल्याची अंधश्रद्ध भीती निर्माण केली. त्यानंतर त्या भीतीचा फायदा घेत विविध जादूटोण्याच्या आणि मंत्रतंत्राच्या विधींचा बनाव रचला. या भितीच्या सावलीखाली आरोपीने बळजोरी करत व धमकावून या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लांछनास्पद व शारीरिक अत्याचार केले.
जेव्हा पीडित मुलीने हा सर्व प्रकार आणि तिच्यावर झालेला अत्याचार अत्यंत धसक्याने व धास्तावलेल्या अवस्थेत आपल्या कुटुंबियांना सांगितला, तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. याप्रकरणी तातडीने पावले उचलत पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा म्हणजेच 'पोक्सो कायदा' (POCSO Act), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोना कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सध्या फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा अतिशय सखोल तपास करत आहेत. अंधश्रद्धेचा असा भयंकर वापर करून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणातील इतर काही जण किंवा अंधश्रद्धेचे जाळे पसरवणारे अन्य कोणी मागे आहेत का, याचाही कसून शोध घेत आहेत.
शहर
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
- मुंबई: "देवेंद्र आबा..." दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुरडीने पिगी बँकेत साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला केले दान!
महाराष्ट्र
- रायगड: महायुतीत वाद पेटला! सुनील तटकरे मला संपवण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत; शिंदेसेनेच्या आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात


























Subscribe to my channel




