पुणे: दस्तनोंदणीतील गैरव्यवहारावर अंकुश आणण्यासाठी आता पक्षकारांचा आधार क्रमांक जोडण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास दस्तनोंदणीत अधिक पारदर्शकता येईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नोंदणी कायद्यामध्ये बदल करावा लागेल.
राज्यात दरवर्षी लाखो दस्तांची नोंदणी होते. राज्य सरकारला गेल्या वर्षी ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, या व्यवहारांमध्ये अनेक गैरव्यवहार होत असल्याने त्यावर अंकुश आणण्याचे राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते.
आतापर्यंत दस्तनोंदणी करताना आधार कार्ड बंधनकारक नव्हते. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता यांची ओळख पटविण्यासाठी कोणताही ठोस पर्याय नव्हता. त्यातून बनावट आधारकार्ड जोडून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याचे काही प्रकार राज्यात उघडकीस आले आहेत.
दस्त नोंदणी करताना आधार कार्ड जोडले जात असले तरी ते बंधनकारक नाही. परंतु ते बंधनकारक करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. गैरव्यवहारावर नियंत्रण मिळविता येणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
— रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक
दस्तनोंदणीसाठीच्या प्रणालीत आधारकार्ड बंधनकारक नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. आधारकार्ड जोडणे ऐच्छिक असल्यामुळे दुय्यम निबंधकांनाही दस्त नोंदवून घेताना 'स्किप' चा पर्याय वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता.
मात्र,मध्यंतरी सरकारी जमिनींच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये आधारकार्डासाठी वापरण्यात येणाऱ्या 'स्किप' पर्यायाचा वापर करून दस्तनोंदणीमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.
तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नोंदणी कायद्यामध्ये बदल करावा लागणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यास दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक होणार आहे.
आधारकार्ड बंधनकारक झाल्यानंतर दस्तनोंदणी करताना आधारकार्डची पडताळणी करून खरेदीदार आणि विक्रेता या दोघांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. तसेच दस्त नोंदणीच्या प्रणालीमध्ये देण्यात आलेला 'स्किप' चा पर्यायही बंद करण्यात येणार आहे. जेणेकरून दस्तनोंदणी करताना होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




