पुणे: पुणे महानगरपालिका (PMC) प्रशासनातून एक अत्यंत मोठी आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी मोठा प्रशासकीय फेरबदल करत, यापूर्वी गंभीर अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या पाच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन तडकाफडकी मागे घेतले आहे. विशेष म्हणजे, या सर्वांची सुरू असलेली विभागीय चौकशी (Departmental Inquiry) देखील रद्द करण्यात आली असून, त्यांना केवळ वेगवेगळ्या विभागांत बदली करून पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. यामुळे महापालिका प्रशासनात कमालीची उलटसुलट चर्चा रंगली आहे.
पाषाण तलाव प्रकरणातील अधिकाऱ्यांना जीवदान
गेल्या महिन्यात पाषाण तलावात दूषित आणि मैलापाणी मिसळल्यामुळे हजारो माशांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः या तलावाची पाहणी केली असता, अधिकारी देत असलेली माहिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती यात मोठी तफावत आढळली होती. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल आयुक्तांनी १० एप्रिल रोजी तातडीने कारवाई करत कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, अनिलकुमार कडू, विभागीय आरोग्य निरीक्षक विजय भोईल आणि आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे या चौघांना एकाच दिवशी निलंबित केले होते. या धडक कारवाईने संपूर्ण महापालिकेत कडक संदेश गेला होता. मात्र, आता अवघ्या काही दिवसांतच या चौघांचेही निलंबन मागे घेत प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
सामान्य प्रशासन विभागातील निलंबनही रद्द
पाषाण तलाव प्रकरणासोबतच सामान्य प्रशासन विभागात (GAD) देखील असाच निर्णय घेण्यात आला आहे. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने दिल्या जाणाऱ्या नियुक्तीचे प्रकरण थेट वरच्या समितीपुढे न ठेवता परस्पर प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या अनियमिततेप्रकरणी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी अधीक्षक (प्रभारी प्रशासन अधिकारी) योगिता जायभाय यांना निलंबित केले होते. प्रशासनाने आता जायभाय यांचेही निलंबन मागे घेऊन त्यांची विभागीय चौकशी रद्द केली आहे. मात्र, त्यांची सामान्य प्रशासन विभागातून थेट औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात (Aundh-Baner Regional Office) बदली करण्यात आली आहे.
प्रशासनात उलटसुलट चर्चा
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या गंभीर त्रुटींवरून सुरुवातीला करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे महापालिका प्रशासनात शिस्त निर्माण झाली होती. मात्र, काही राजकीय दबावानंतर किंवा अंतर्गत लॉबिंग यशस्वी झाल्यामुळे या पाचही जणांची चौकशी पूर्ण न करताच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. केवळ बदल्या करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याने, आयुक्तांनी घेतलेला हा मवाळ निर्णय महापालिकेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटवणारा ठरत आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




