सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील पाल येथे दोन तरुणांच्या गटांत झालेल्या मारामारीमुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या वादाच्या कारणावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यात सहा जण जखमी झाले असून वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांनी तब्बल १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
जुन्या वादातून उफाळली हाणामारी: मिळालेल्या माहितीनुसार, पाल गावातील दोन गटांत जुना वाद होता. गणेशोत्सवाच्या काळात हाच जुना वाद पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर काठ्या, लाकडी दांडके आणि लोखंडी वस्तूने हल्ला केला. या घटनेत ओमकार पवार, प्रमोद शिंदे, पृथ्वीराज शिंदे, शुभम भोसले यांच्यासह इतर नागरिक जखमी झाले. तसेच घटनेदरम्यान कार आणि दुचाकी अशा दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली.
गावातील तणाव शांत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गणेशोत्सवाच्या उर्वरित काळात गावात तणाव वाढू नये आणि शांतता सुव्यवस्थित राहावी, यासाठी पोलिस अधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या सामंजस्याच्या निर्णयानुसार, वाद मिटवण्यासाठी दोन्ही गणेश मंडळांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार विसर्जन पार पाडले.
पोलीस बंदोबस्त आणि कारवाई: गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी १४ संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास उंब्रज पोलिस करत आहेत.
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
- कोल्हापुर: अनोखी पर्यावरणपूरक परंपरा; रंगांमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी सलग चार पिढ्यांपासून तीन गावांत बसवले जातात पूर्णपणे रंगरहित बाप्पा
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




