वर्धा: देवळी स्थानिक इंदिरानगरमधील राहते घर झुडपी जंगलामध्ये आरक्षित असल्याच्या कारणावरून घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने अंबादास केवदे नामक व्यक्तीने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेतील घरकूल अभियंता राहुल जैस्वाल यांच्या दालनात मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. शासन व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गरजू घरकूल लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटपाचा घोळ निस्तारत नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबादास केवदे यांनी पालिका कार्यलयात येऊन माझा घरकुलाचा अर्ज कशासाठी नामंजूर केला? अशी विचारणा करत अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोबतच मला मारण्याची धमकी दिली अशी तक्रार अभियंता जैस्वाल यांनी पोलिसात दिली.
केवदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
तक्रारीवरून केवदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेकडून केवदे यांना तुमच्या राहत्या घराची जागा झुडपी जंगलमध्ये येत असल्याने घरकुलचा लाभ देता येत नसल्याचे सांगण्यात आले. पण, याआधी काहींना याच जागेवर घरकुलचा लाभ दिला असल्याने केवदे यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
शासनाच्या जागेवर झुडपी जंगल असा उल्लेख
झुडपी जंगलामध्ये आरक्षित असलेल्या जागेवर पट्टे वाटपाचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. शासन व वनविभाग यांच्या दरम्यानचा हा मामला अजूनही निकालात न निघाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तत्कालीन मंत्री सुनील केदार पालकमंत्री असताना देवळीतील १८४ घरकूल लाभार्थ्यांना पट्टे वाटप केले होते. यात इंदिरा नगरमधील काही लाभार्थ्यांना पट्टे मिळाले होते. त्यावेळी या जागेच्या सर्व्हे नंबर व सातबारावरील उल्लेख शासन असा होता. परंतु आता या सातबारावर झुडपी जंगल असा उल्लेख नमूद आहे. त्यामुळे या जागेच्या सातबारावर शासन ते झुडपी जंगल असा बदल कसा झाला? असा आक्षेप घेतला जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पालिका निवडणुकीच्या जाहीर सभेत झुडपी जंगल हटवून घरकुलाचे पट्टे देण्याचे आश्वासन दिले होते.
शासनाच्या निर्देशानुसार कारवाई होणार
गैरअर्जदार केवदे यांच्या राहत्या घरी झुडपी जंगलमध्ये येत असल्याने शासन निर्णयानुसार त्यांना घरकुलचा लाभ देता येत नाही. तहसील कार्यालयाच्या सातबाऱ्यानुसार या जागेचे स्टेटस झुडपी जंगल आहे. सोबतच सदरचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल.
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




