पुणे: जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट विरोधकांवर आणि बंडखोरांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. विशेष म्हणजे, स्वतंत्र पॅनेल उभे करणारे आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याच वाणेवाडी गावात पहिली जाहीर सभा घेत सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना सज्जड दम भरला आहे.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या, तसेच त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, "आदरणीय अजितदादा हे अत्यंत विशाल मनाचे आणि मोठ्या मनाचे नेते होते, त्यांच्या स्वभावात सगळयांना सामावून घेण्याची मोठी वृत्ती होती. परंतु, मी दादांसारखी नाही!" असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी बंडखोरांना आणि विरोधकांना कडक इशारा दिला आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि ताकदीवर निवडणूक लढवण्याची हिंमत असेल, तर त्यांनी प्रचारात अजितदादांचे नाव आणि त्यांचे फोटो वापरणे तात्काळ बंद करावे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सोमेश्वर निवडणुकीत राजकारणाचा रंग: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा केवळ एक कारखाना नसून तो हजारो शेतकरी सभासदांच्या कष्टाची आणि विश्वासाची शिदोरी आहे. अनेक पिढ्यांपासून या संस्थेने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आहे. अशा या सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्वार्थाची गरज नव्हती. मात्र, दुर्दैवाने या निवडणुकीला राजकीय रंग देण्यात आला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या पश्चात होत असलेल्या या निवडणुकीत काही मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी दादांचे नाव वापरतात आणि अंतर्गत राजकारण करतात, हे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभासदांच्या हिताचा आणि विश्वासाचा मुद्दा: सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, दादांचा सोमेश्वर कारखान्यावर पोटच्या मुलासारखा जीव होता. या कारखान्याला उभे करण्यासाठी आणि उच्च दर्जावर नेण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य आणि आमदारकी पणाला लावली होती. आज काही लोक या विकासाचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत, परंतु हा कारखाना कोणड्या एका व्यक्तीची मालमत्ता नसून तो हजारो शेतकरी सभासदांचा घाम आणि कष्टाचे फलित आहे. येत्या ११ तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सभासदांनी कपबशी चिन्हावर मतदान करून सोमेश्वरची परंपरा आणि स्वाभिमान कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत त्यांनी निवडणुकीनंतर सर्व विजयी उमेदवारांना विश्वासात घेऊनच अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल, असा शब्दही दिला.
शहर
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




