सांगली: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातुन एक अतिशय मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातीतल जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मायथळ (सोलनकर वस्ती) परिसरात पती-पत्नीमध्ये झालेल्या तीव्र वादामधून एका तरुण मातेने आपल्या अवघ्या १८ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची किंवा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की काय घडले प्रकरण? मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मृत महिला नीता गजानन सोलनकर (वय २९) आणि तिची दीड वर्षाची लहान मुलगी अवनी गजानन सोलनकर (वय १८ महिने) अशी या मृत मायलेकीची नावे आहेत. मृत नीता सोलनकर आणि तिचा पती यांच्यामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून आणि आपसात वाद सुरू होते. या वादानंतर निर्माण झालेल्या टोकाच्या मानसिक तणावातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी मायथळ येथील सोलनकर वस्तीवरील एका विहिरीत मायलेकीचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने स्थानिकांमध्ये एकच वर्दळ उडाली.
घटना समजताच उमदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने अथक प्रयत्न करून दोन्ही मृतदेह ४० ते ५० फूट खोल असलेल्या विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह पाण्याबाहेर काढताच उपस्थित नातेवाईक आणि कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला, ज्याने उपस्थितांचे मन सुन्न झाले. दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणी व उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
नातेवाईकांचा रोष आणि सासूला मारहाण: या दुर्दैवी घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरकडील आणि सासरकडील नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. पती-पत्नीमधील वादानुसार नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, यावरून संतप्त झालेल्या काही नातेवाईकांनी मृत महिलेच्या सासूलाही (मृताच्या सासूला) मारहाण केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू व इतर संबंधित कलमांखाली नोंद करण्यात आली असून, यामागील नेमके कारण काय होते आणि हत्येची किंवा आत्महत्येची पार्श्वभूमी काय आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल.
शहर
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
महाराष्ट्र
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!


























Subscribe to my channel




