नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडपट्टीत अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत स्वतःच्याच सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याचा त्याच मुलीने खात्मा केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय ४५ वर्षे असून तो मोलमजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी लोकांच्या घरी धुनीभांड्याची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकते. त्यांना १७ वर्षांची एक मुलगी आणि एक लहान मुलगी आहे. त्यांची मोठी मुलगी ही १२ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. मृत व्यक्तीला दारूचे तीव्र व्यसन होते आणि तो रोजच दारू पिऊन घरी धिंगाणा घालायचा. नेहमीप्रमाणे तो सोमवारी रात्री उळाशी अत्यधिक दारूच्या नशेत घरी परतला. त्या वेळी घरात केवळ त्यांची १७ वर्षांची मुलगी आणि तिचा लहान भाऊ उपस्थित होते. आई कामावरून अद्याप घरी परहली नव्हती.
दारूच्या नशेत पूर्णपणे तरार असलेल्या त्या नराधम पित्याने घरातील परिस्थितीचा गैरफायदा घेत स्वतःच्याच अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा व छेडछाड करण्याचा नीच प्रयत्न केला. पित्याच्या या विकृत आणि अमानुष कृत्यामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलीने स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि संतापाच्या भरात जवळच असलेली बॅट उचलून थेट त्याच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यामुळे तो तोल जाऊन फरशीवर आदळला, आणि फरशीचा एक तुकडा त्याच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
काही वेळातच मृतकाची पत्नी (आरोपी मुलीची आई) काम आटोपून घरी परतली. घरी आल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पती आणि घाबरलेली मुलगी पाहून तिला धक्काच बसला. तेव्हा मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला रडत-रडत सांगितला. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही लपवाछपवी न करता मध्यरात्री स्वतः त्या तरुणीने फोन करून एमआयडीसी पोलिसांना हत्येच्या या घटनेची सविस्तर माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांच्या यंत्रणेत एकच खळबळ उडाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहायक पोलीस आयुक्त वैभव जाधव, सहायक पोलीस आयुक्त यशवंत नलावडे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने गंभीर जखमी असलेल्या त्या व्यक्तीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पिता गेल्या दोन वर्षांपासून आई घरी नसताना तिला सातत्याने असाच त्रास देत होता. त्याची ही विकृती दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि नशेत तो सतत छेडछाड करत असे, असा गंभीर आरोप तिने केला. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी अल्पवयीन मुलीला बाल संरक्षण समितीच्या अधिकाऱ्यांसमोर नियमानुसार हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
महाराष्ट्र
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


