
Pune : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांसह राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये शोकाचं वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. दोन्ही पायलट अचानक बदलले, याची चौकशी होणे गरजेचे आहे, कारण घात की अपघात? असा प्रश्न रुपाली पाटील यांनी विचारला आहे.
रुपाली पाटली यांची फेसबुक पोस्ट काय?
"अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो, कसे झाले, का झाले, काहीच कळत नाही. देवाने लाखोंचा पोशिंदा नव्हता न्यायचा, आमच्या सारखे न्यायचे होते, अत्यंत अघटीत घडले. आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील, पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत." असं रुपाली पाटील यांनी लिहिलं आहे.
|
|
"फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांना एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया— या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? याची चौकशी होणे गरजेचे, कारण घात की अपघात?" असा प्रश्न रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्या निधनाला जेमते तीन दिवस झाले असताना इतक्या घाईने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी का उरकण्यात आला, अशी चर्चा राज्यात दिवसभर सुरू होती. या चर्चेच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळातून हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतून यासाठीची सूत्रे फिरल्याचे कळते.
पेच टाळण्यासाठी खेळी
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत संबंधित पक्षांच्या प्रमुखांमध्ये चर्चा सुरू असली तरी शरद पवार यांनी मात्र आमच्या गटाची ‘एनडीए’मध्ये वेगळा घटक पक्ष म्हणून नोंदणी करावी असा आग्रह धरला होता. तो फेटाळताना, ‘तुम्हाला यायचे असेल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊनच यावे लागेल,’ अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली होती. अजित पवार यांच्या निधनाने यदाकदाचित शरद पवार यांच्याकडे दोन्ही पक्षांची सूत्रे एकवटली, तर पुन्हा नवा पेचप्रसंग येऊ नये यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सोपविण्याच्या निर्णयाला गती दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
राजकीय अपरिहार्यता
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही कार्यकर्ते टीका करीत असले तरी हा शपथविधी तातडीने करणे गरजेचे असल्याचे ‘राष्ट्रवादी’तील नेते व सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. आमदारांमध्ये निर्माण झालेली प्रचंड अस्वस्थता आणि पक्षनेतृत्व कुणाच्या हातात जाणार याबाबत उठलेले अफवांचे पीक यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे या निकटवर्तीयांनी ‘मटा’ला सांगितले. त्यामुळेच इतक्या घाईघाईने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी समारंभ पार पाडण्यात आला. या निर्णयावर टीकाही झाली. हा विषय दिवसभर चर्चेत होता.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Rupali Patil : अजित दादांचे मूळ दोन्ही पायलट उशिरा का आले? अचानक पायलट बदलले गेले; अपघात की घात? रुपाली पाटलांचे गंभीर सवाल”