सोलापूर: धाराशिव महामार्गावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या शेळगी ब्रिजवर एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पुणे ते उमरगा जाणारी 'हिरकणी' बस आणि एका मालट्रक यांच्यात झालेल्या जोरदार अपघातात बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या दुर्दैवी आणि भीषण अपघातात एसटी बसचा चालक आणि एक महिला प्रवासी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य सुमारे १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एसटी महामंडळाची बस (क्रमांक एमएच १४ एलबी ०३८०) ही पुणे येथून प्रवाशांना घेऊन उमरगाच्या दिशेने निघाली होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हद्दीतील मार्केट यारजवळ असलेल्या शेळगी पुलावर आली असता, समोर चालत असलेल्या आणि लोखंडी सळ्या वाहतूक करणाऱ्या मालट्रकला (क्रमांक एमएच १३ एएक्स ३९४९) एसटी बसने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक आणि तीव्र होती की, एसटी बसचा पुढील संपूर्ण भाग चक्काचूर होऊन रस्त्यावर प्रवाशांच्या बॅगा व साहित्याचा खच पडला होता. या भीषण अपघातात बसचालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, उमरगा, जि. धाराशिव) आणि महिला प्रवासी नागुबाई राम रेवघे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे दोघे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्या इतर १० प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा



























Subscribe to my channel



