
Pune : महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३५ लाख ५१ हजार मतदार आहेत. त्यातही पुरुषांची संख्या अधिक आहे. मात्र, ४१ पैकी नऊ प्रभागांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे सक्रिय राजकारणात व निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढले आहे. पुण्यात १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यात ८३ महिला, तर ८२ पुरुष नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे पुरुषांपेक्षा एक महिला जास्त निवडून येणार आहे. त्यातही खुल्या गटातून एखादी महिला निवडणूक जिंकल्यास संख्या आणखी वाढू शकेल.
|
|
महापालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३५ लाख ५१ हजार ४६९ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या एक लाख १३ हजार ४३० ने कमी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रभागातील महिला मतदारांची संख्याही कमीच असणार असे वाटते. परंतु, निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या मतदार यादीमध्ये नऊ प्रभागांत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
महिलांची भूमिका महत्त्वाची
पूर्वीच्या काळी घरातील प्रमुख व्यक्ती सांगेल त्या पक्षाला, उमेदवाराला महिला मतदान करत होत्या. आता आपण कोणाला मतदान करायचे, याचा निर्णय स्वतः महिला घेतात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील निकालावर झालेले परिणाम सर्वापुढे आहेत. पुणे शहरात अनेक इच्छुक उमेदवार महिलांसाठी खास तीर्थक्षेत्र पर्यटन, प्रशिक्षण आदी उपक्रम राबवून त्यांचे मतदान मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येणार आहेत.
कसबा, कँटोन्मेंटमध्ये महिला अधिक
४१ पैकी नऊ प्रभागांमध्ये महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील चार प्रभागांत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यानंतर कँटोन्मेंट मतदारसंघातील दोन प्रभाग, शिवाजीनगर, कोथरूड आणि वडगाव शेरी मतदारसंघातील प्रत्येकी एका प्रभागात महिला मतदार जास्त आहेत.
मतदार
पुरुष - १८,३२,२०५
महिला - १७,१८,७७५
तृतीयपंथी - ४८९
एकूण - ३५, ५१, ४६९
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



