
Pune : पुण्याहून मुंबईला अवघ्या ९० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे-मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधणार आहे. त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) नुकतीच मंजुरी मिळाली असून, सहा महिन्यांत हा 'डीपीआर' पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नवीन द्रुतगती मार्गासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दिवसाला किमान अडीच ते तीन लाख वाहने या मार्गावरून सहजरित्या धावू शकतील, अशी याची क्षमता असणार आहे. हा मार्ग मुंबईतील अटल सेतूला आणि पुण्याच्या वर्तुळाकार रस्त्याला (रिंगरोड) जोडला जाणार आहे. परिणामी केवळ मुंबई-पुणेच नव्हे, तर मुंबई-बंगळूर हा प्रवासदेखील गतिमान होणार आहे.
|
|
पुणे-मुंबईदरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी किमान अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो.
अपघात अथवा दरडी कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनधारक तासनतास अडकून पडतात. परिणामी पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठीच आता 'एनएचएआय' नवीन द्रुतगती मार्ग बांधणार आहे.
अटल सेतू ते पुणे 'रिंगरोड' असा हा मार्ग असणार आहे. याची सुरुवात मुंबईतील अटल सेतू जवळून सुरू होईल. तिथून तो नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदराला जोडला जाईल. पुढे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून बोगदे आणि पुलांच्या साह्याने हा मार्ग पुण्यातील शिवरे (ता. भोर) येथे संपेल, जिथे तो प्रस्तावित पुणे 'रिंगरोड'ला जोडला जाईल. परिणामी सातारा, कोल्हापूर, बंगळूरला जाणाऱ्या वाहनासाठी पुण्यात येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पुण्यात दाखल होणाऱ्या विशेषतः जड वाहनांची संख्या कमी होणार आहे.
नवीन द्रुतगती मार्ग ८ मार्गिकांचा असणार
चार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या, चार पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर असणार
आठ मार्गिकवरून तासाला १२ हजार वाहने धावू शकतील
दिवसाला किमान पावणे तीन लाख वाहने सहजरित्या धावतील
सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
पुणे-मुंबईदरम्यान आणखी एक द्रुतगती मार्ग होणार आहे. पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड कॉरिडॉर'चा हा भाग असणार आहे. या मार्गाच्या 'डीपीआर'ला मंजुरी मिळाली असून, लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षात मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




