
पुणे : राज्यातील २० आणि २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक, डी.एड. बी.एड. पात्रताधारकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयावर राज्यभरातून टीका झाल्यानंतर आता या निर्णयात बदल करण्यात आला असून, १० किंवा १०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर केवळ डी.एड. बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी नियुक्ती केली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील २० किंवा २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी मंजुर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक, डी.एड., बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची १५ हजार रुपये दरमहा वेतनावर कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला होता. शिक्षण क्षेत्रातून, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रताधारकांकडून या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने या निर्णयात बदल केला.
|
Pimpri : औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग; एमआयडीतीसील उद्योजकांचे आंदोलन |
तसेच ५ सप्टेंबर रोजीचा निर्णय रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार, २० किंवा २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांऐवजी आता १० किंवा १०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये मंजुर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक डी.एड. बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना वगळण्यात आले आहे.
सुरुवातीला एका वर्षासाठी ही नियुक्ती करून गुणवत्ता आणि योग्यतेच्या आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नूतनीकरण करता येईल. त्यासाठी दरमहा १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. अन्य कोणतेही लाभ लागू नसतील. या नियुक्तीसाठी कमाल आणि किमान वयोमर्यादा लागू असेल. नियुक्त कंत्राटी शिक्षकांना एकूण बारा रजा मिळतील. ही नियुक्ती करार पद्धतीची असल्याने संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सामावून घेण्याचे, नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करावा लागणार आहे. अध्यापनाचे तास नियमित शिक्षकांप्रमाणे असतील. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र उमेदवारांतून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज





























Subscribe to my channel




