या आठवडाअखेरीस किंवा पुढच्या आठवड्याच्यासुरुवातीला बांगलादेशात लोकनियुक्त सरकार सत्ता हातीघेऊ शकते. अवामी लीगला निवडणुकीत सहभागीहोण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळेविश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. तरीहीलोकशाहीच्या निकषावर ही निवडणूक काही अंशी नि:पक्षम्हणता येईल, कारण पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे सैन्यनिवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाही किंवा त्यांनीकोणत्याही उमेदवाराचे समर्थनही केलेले नाही. यूपीए-२ च्या काळात भारत आणि बांगलादेश यांनीसीमा प्रश्न, विशेषतः सीमेच्या दोन्ही बाजूला असलेल्यावस्त्यांचा मुद्दा सोडवण्यासाठी करार केला होता. तेव्हाभाजपमध्ये कोणीही या कराराला उघडपणे विरोध केलानव्हता. तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी तर त्याचेसमर्थन केले होते. तरीही पक्षाने संसदेत त्यात अडथळेआणले होते. ते त्यावेळच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षाचे फळहोते. तेव्हा बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी अहमदाबादलाजाऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होतीआणि त्यांचे समर्थन मागितले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने, ६ जून२०१५ रोजी भारत-बांगलादेश भू-सीमा कराराला मंजुरीदेण्यात आली. याचसोबत दोन्ही देशांनी सागरी सीमाहीनिश्चित करून ती स्वीकारली. यासाठी ममता बॅनर्जीयांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळवावे लागले. आसामआणि त्रिपुरातील भावनाही शांत कराव्या लागल्या. अशाप्रकारे बांगलादेश हा एकमेव असा मोठा शेजारी देश बनला,ज्याच्याशी भारताने सर्व सीमा विवाद सोडवले आहेत.बांगलादेशसोबतचा सीमा करार हा मोदी सरकारच्या १२वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी धोरणात्मक उपलब्धी मानली जाते. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण हा करारअशा वेळी झाला जेव्हा शेजारील देशांशी संबंध तणावपूर्णहोते. अनेक अर्थांनीही मोदींच्या मोठ्या यशांपैकी एकयश मानले जाऊ शकते. असे असूनही विशेषतः पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचे राजकारण दीर्घकाळापासून अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर केंद्रित राहिले आहे.प. बंगालच्या दोन विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा खूप तापला होता, आज आपण इतिहासाच्या अशाच एका वळणावर उभे आहोत. फरक इतकाच आहे की, २०१४ च्या तुलनेत आज धोरणात्मक प्रभाव आणि शक्यता खूप मोठ्या आहेत. बांगलादेशातील निवडणुका प. बंगाल आणि आसामच्या निवडणुकांच्या काही महिने आधी होत आहेत. ही एकप्रकारे चांगली संधी आहे. कारण सध्या ‘घुसखोर’ हीघोषणा खूप तीव्र झालेली नाही. मात्र, पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात त्याचा उल्लेख नक्कीच केला आहे.पण सोशल मीडिया आणि अनेक टीव्ही चॅनेलवर बांगलादेशबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत.बांगलादेशातील निवडणुका पश्चिम बंगाल आणिआसामच्या निवडणुकांनंतर होत नसल्यामुळे, सरकारकडेपरिस्थिती सामान्य करण्याची आणि संतुलनाकडेपरतण्याची संधी आहे. मात्र, शेख हसीना यांच्याकाळासारखे संबंध पुन्हा प्रस्थापित होणे आता कठीणदिसते. ही वेळ ढाकामध्ये भारताच्या पसंतीच्या नेत्यालानाकारण्याची किंवा मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनेपरराष्ट्र धोरणात केलेल्या मोठ्या बदलांबद्दल नाराजी व्यक्तकरण्याची नाही. युनूस गेल्या दीड वर्षापासून पाकिस्तानलाखुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी त्यांनीअनेक प्रक्षोभक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ,भारताला चिडवण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनाबोलावण्यात आले. त्यांच्या सरकारने मोठी शस्त्रे खरेदीकरण्याबाबत चर्चा केली आणि भारताच्या ईशान्येकडीलराज्यांबाबतही भडकाऊ विधाने केली गेली. त्यांनी शेखहसीना यांना भारतात आश्रय देणे हे ‘करार मोडणारे’ पाऊलअसल्याचे म्हटले. पण बांगलादेशच्या दृष्टीने हे दूरदृष्टीचाअभाव दर्शवणारे आणि भारताला उकसवणारे आहे. जमेचीबाजू ही की, युनूस यांना एका आठवड्याच्या आत निवडूनआलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी लागेल. खालिदाझिया यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरयांना पाठवून आम्ही एक व्यावहारिक पाऊल उचलले.त्यांनी त्यांचे चिरंजीव आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे(बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांचीही भेट घेतली.आतापर्यंत रहमान एक समजूतदार नेते म्हणून समोर आले आहेत. वास्तव हे आहे की, निवडणूक कोण जिंकेल किंवा कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, हे कोणालाहीमाहीत नाही. आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमध्ये तारिकरहमान आणि बीएनपीला आघाडी मिळताना दिसत आहे. ‘प्रोथोम आलो’ या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या सर्वेक्षणांनुसार, ८३टक्के बांगलादेशी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा मानतात,७७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की व्यवसायासाठीवातावरण चांगले नाही आणि ३५ टक्के लोक देशाच्याआर्थिक स्थितीबाबत निराश आहेत. इस्लामीकरण किंवा कट्टर राष्ट्रवाद म्हणजेचभारत-विरोधाकडे तेथील लोकांचा फारसा कल दिसतनाही. सामान्य जनतेचा कल भारताच्या विरोधात नक्कीचआहे, विशेषतः हसीना यांच्या मुद्द्यावरून, पण सर्वातमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ५४ टक्के लोकांना आशा आहे कीनवीन सरकार सामाजिक-धार्मिक सहिष्णुता पुन्हा प्रस्थापितकरेल. ‘पीपल्स इलेक्शन सर्व्हे’नुसार ४७ टक्के लोकतारिक रहमान यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात, तरकेवळ २२.५ टक्के लोक जमात-ए-इस्लामीच्या शफीकुररहमान यांना पसंती देतात. यावरून जमातला मिळणाऱ्यासमर्थनाची पातळी स्पष्ट होते. युनूस यांच्यासह काहीशक्तींना त्रिशंकू संसद हवी असेल जेणेकरून जमातलासामील करून सरकार स्थापन करता येईल. या निवडणुकाआपल्याला बांगलादेशसोबतचे संबंध नव्याने सुरूकरण्याची संधी देत आहेत. बंगाल आणि आसामच्यानिवडणुका पाहता हे एक आव्हानही आहे. अशापरिस्थितीत आपण भारताच्या पूर्वेला धोरणात्मक स्थिरतापरत आणण्याचे प्रयत्न करणार का? याचा अर्थ असा होईलकी या राज्यांमधील निवडणूक प्रचारादरम्यानबांगलादेशविरोधी भाषा मवाळ ठेवली जावी. अथवा मगआपण आपल्या पूर्वेला एक ‘बंगाली भाषिक पाकिस्तान’तयार होऊ देण्यास तयार आहोत का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीत कट्टरपंथी आवाजांनाकमी महत्त्व मिळते...निवडणूक प्रचारात बीएनपी किंवा जमातयांपैकी कोणीही पाकिस्तानबद्दल भाष्यकेलेले नाही. जमात भारतासोबत मैत्रीपूर्णसंबंधांबद्दल बोलत आहे, तर बीएनपी सर्वांशीपरस्पर आदरावर आधारित संबंधांची अपेक्षाकरत आहे. हे सकारात्मक संकेत आहेत.कट्टरतावाद्यांची स्वीकारार्हता कमी होत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




