
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारासह अंधेरी पश्चिमेकडील एका पान टपरी चालविणाऱ्याचे अपहरण करून ४३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चारही जणांना अटक केली असून या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. चंद्रशेखर दराडे, हेमंत कापसे, सागर वाघ आणि नितीन गाढवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यातील चंद्रशेखर दराडे आणि हेमंत कापसे यांना हे प्रकरण उघडकीस येताच सेवेतून निलंबित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेकडील एस व्ही रोडवर मोहम्मद अरिफ खान भाड्याने पान टपरी चालवण्याचा व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून करत आहे. मागील आठवड्यात एक आर्टिका कार दुपारच्या वेळी त्यांच्या टपरी समोर येऊन उभे राहिली. यानंतर त्या कारमधील दोघेजण खाली उतरून त्यांनी टपरी चालकाला आपण अन्न व औषध प्रशासन विभागात इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. तू या टपरीवर गुटखा विकतोस असे म्हणत आरिफला आर्टिका कार मध्ये बसवले. कार दादरच्या दिशेने जात असताना या चौघांनी आरिफ कडे पैशांची मागणी केली. जर तू पैसे दिले नाहीस तर तुझ्या विरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करू असे.
|
|
आरिफला धमकावत त्यांनी त्याच्याकडील खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने घेतले. शिवाय आरिफच्या मित्राकडून तीस हजार रुपये ऑनलाईन मागवून घेतले आणि पुन्हा आरिफची झडती घेऊन साडेतीन हजार रुपये देखील उकळले अशाप्रकारे अपहरणकर्त्यांनी एकूण त्रेचाळीस हजार पाचशे रुपये जबरदस्तीने उकळले आणि आरिफला सोडून दिले. यानंतर आरिफ घरी आल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपले कुटुंबीय आणि मित्रांना सांगितला. मित्रांच्या सल्ल्यावरून आरिफने डी एन नगर पोलीस ठाणे येथे जाऊन या चौघां विरोधात तक्रार दिली आरिफच्या या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डी एन नगर.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरात असणाऱ्या पान टपरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या गुन्ह्यात सहभागी असलेले चंद्रशेखर दराडे, हेमंत कापसे, सागर वाघ आणि नितीन गाढवे यांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चंद्रशेखर दराडे आणि हेमंत कापसे या पोलीस कर्मचाऱ्यांचे सेवेतून तात्काळ निलंबन करण्यात आले असून पोलीस अधिकचा तपास करत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




