छत्रपती संभाजीनगर / बजाजनगर: छत्रपती संभाजीनगर जवळील बजाजनगर परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एएस क्लब परिसरातील उड्डाणपुलावरून (Flyover) खाली उडी मारत एका १८ वर्षीय तरिणिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या भीषण प्रकारामध्ये सदर तरुणीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून तिच्या चेहरा आणि जबड्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात व डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
काय घडली नेमकी घटना? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित तरुणी गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातील मंडळींना सेतू केंद्रावर जाऊन काही महत्त्वाचा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, काही वेळातच ती सरळ बजाजनगर येथील एएस क्लब जवळील उड्डाणपुलावर जाऊन पोहचली. तिथून तिने अचानक खाली उडी टाकून आपले जीवन संपवण्याचा टोकाचा प्रयत्न केला. सकाळी अकराच्या सुमारास तिच्या बहिणीच्या मुलीकडून कुटुंबीयांना या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पोलिसांची तत्परता आणि मदतकार्य: घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अशोक थोरात आणि अजित परशूवाले यांनी तातडीने सतर्कता दाखवत ११२ क्रमांकावर संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
तरुणीची पार्श्वभूमी आणि पुढील तपास: पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या तरुणीने २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात मिलिंद महाविद्यालयातून आपली बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली होती. तिला पुढे कायद्याचे (Law) उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती आणि यासाठी तिने शिक्षणात एक वर्षाचा गॅप देखील घेतला होता. मात्र, इतकी हुशार आणि अभ्यासू असणाऱ्या या तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून किंवा नैरास्यातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून घेतली असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




