
Pune : राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला आहे. १ जून ते ४ सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यात नगर, सांगलीत सरासरीपेक्षा जास्त, तर हिंगोलीत सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे.राज्यात एक जून ते चार सप्टेंबर या काळात सरासरी ८४५.१ मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा २९ टक्के अधिक, म्हणजे १ हजार ९३ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. कोकणात ३ हजार २७६ मिलिमीटर (सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ९०३.७ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ४८ टक्के अधिक), मराठवाड्यात ६७३.९ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ३३ टक्के अधिक), तर विदर्भात ९५४.५ मिलिमीटर (सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला आहे. नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत ७९ टक्के (५८१ मिमी), तर सांगलीत सरासरीच्या ७२ टक्के (६२८ मिमी) अधिक पाऊस झाला आहे. तसेच सरासरीच्या ५० टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद जळगाव (५१ टक्के), पुणे (५५ टक्के), बीड (५१ टक्के) आणि लातूर (५९ टक्के) जिल्ह्यांत झाली आहे.
|
|
कोकणात सरासरीच्या २७ टक्के आणि विदर्भात सरासरीच्या १७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. कोकण, विदर्भाच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे.
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली, तरी हिंगोलीत सरासरीच्या ३१ टक्के कमी पाऊस झाला आहे. हिंगोलीतील पावसाची सरासरी ६४७.५ मिमी आहे. तेथे यंदा ४४७ मिमी पाऊस पडला. अमरावतीत २ टक्के कमी पाऊस झाला आहे. अमरावतीची सरासरी ७०९.३ मिमी असून, यंदा ६९५.७ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. गोंदियात ८ टक्के कमी पाऊस पडला आहे. गोंदिया जिल्ह्याची सरासरी १ हजार ६३ मिमी आहे. मात्र, यंदा ९८०.७ मिमी पाऊस पडला आहे. हे तीन जिल्हेवगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोलीत कमी पाऊस का ?
गेल्या चार- पाच दिवसांत हिंगोलीत चांगला पाऊस झाला आहे. मात्र, जून ते ऑगस्टअखेर पावसाने ओढ दिली होती. हिंगोलीची भौगोलिक रचना आणि स्थान असे आहे, की विदर्भातून आणि तेलंगणावरून येणारा पाऊस हिंगोलीत पोहोचेपर्यंत पावसाचा जोर कमी होतो. गेल्या वर्षीही हिंगोलीत पावसाने ओढ दिली होती. पाऊस हिंगोलीत सप्टेंबरअखेर सरासरी गाठेल, असे मत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



