
Prithviraj Chavan : लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीसारखं मोठं आव्हान विधानसभेच्या निवडणुकीमध्येही देण्याच्या तयारीत आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यासंदर्भात महाविकास आघाडीत बऱ्याच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्येही याबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फार्म्युला कसा असेल? याबाबत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य असतील का? या प्रश्नावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडीचा फार्म्युलाच सांगितला आहे. ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या कार्यक्रमात बोलत होते.
|
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी |
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील हे तुम्हाला मान्य आहे का? या प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर लढत होतोत तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
या निवडणुकीत मोठा बदल जाणवतो
यावेळी पुढे बोलातना पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक, काँग्रेसचा प्रचार, महाविकास आघाडीची कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनिती यासह वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केलं. चव्हाण म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत फार मोठा बदल जाणवतो. आताच्या घडीला माझं महाराष्ट्राचं जे आकलन आहे, त्यानुसार महाविकास आघाडीला लोकसभेला ३२ ते ३५ जागा मिळतील, ही संख्या वाढू शकते. आम्ही या निवडणुकीत पाच मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले वगैरे नैतिक भ्रष्टाचार, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव, या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सगळे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आम्हाला दिले आहेत, असंही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


