
Nagpur : मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत ३२ टक्के काम पूर्ण झाले असून मेट्रोचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२७पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जामठा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रोच्या अशोकवन स्थानकापर्यंत जावे लागेल. तिथून जामठा स्टेडियमपर्यंत सहज पायी जाता येईल. यामुळे वाहतूक कोंडी कायमची सुटेल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला.
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्प्यातील कामानेही गती घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो ४३.८ किलोमीटर मार्गावर धावणार असून ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२४मध्ये हे काम हाती घेण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो ४३.८ किलोमीटर मार्गावर धावेल. ट्रान्स्पोर्टनगर (कापसी) आणि पश्चिमेकडील हिंगणा, उत्तरेकडील कन्हान, दक्षिणेतील बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत मेट्रो पोहोचेल. फेज-१ आणि फेज-२ मिळून नागपुरात मेट्रोचे ८३.८ किलोमीटरचे जाळे तयार होत आहे. केवळ ट्रॅकची एकच निविदा काढणे बाकी आहे. पुढील सहा महिन्यांत ही निविदाही काढण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक जमीनही मिळाली आहे. आजच्या स्थितीला मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होत असून मुदतीच्या आत दुसऱ्या टप्प्यातील कामही पूर्ण होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे.
|
|
अशी होणार सुविधा
सध्या नागपूर मेट्रो रेल्वे 'लोकमान्यनगर ते प्रजापतीनगर' आणि 'ऑटोमोटीव्ह चौक ते खापरी' अशी धावत आहे. चारही बाजूने मेट्रोचा विस्तार होत आहे. खापरीच्या पुढे बुटीबोरी आणि त्यापुढे एमआयडीसी ईएसआरपर्यंत मेट्रो जाईल. या मार्गात अशोकवन मेट्रोस्थानक आहे. जामठा येथे जाण्यासाठी अशोकवन येथे उतरावे लागेल. तिथून अवघ्या ५०० मिटर अंतरावर जामठा स्टेडियम आहे. जानेवारी २०२७मध्ये 'ऑटोमोटीव्ह चौक ते लेखानगर' हा ६.७ किलोमिटरचा मार्ग पूर्ण होईल. सध्या या मार्गावर ७०टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२७मध्ये दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे, असे महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी यांनी सांगितले.
प्रकल्पाची सद्यस्थिती
१४ लाँचरच्या (मशिन्स) साहाय्याने प्रकल्पाचे काम सुरू
सद्यास्थितीत एकूण ४४ किलोमिटर क्षेत्रात काम सुरू
३२पैकी २८ स्थानकांचे काम प्रगतीपथावर
उर्वरित स्थानकांवरही महिनाभरात कामास सुरुवात
चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत ८५० कोटींची कामे पूर्ण.
आर्थिक वर्ष संपेपर्यंत १ हजार ५० कोटींचे काम पूर्ण होण्याचा अंदाज
दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी ५ हजार ४०० मनुष्यबळ कार्यरत
कुशल मनुष्यबळ बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा येथून आणले आहे
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel





Boost your profits with our affiliate program—apply today!