नागपूर: कॉँग्रेस व राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने देशातील संवैधानिक संस्थांवर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. देशाचे मूळ संविधान हटवून त्याजागी कम्युनिस्ट विचारसरणीचे संविधान आणण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून विदेशी शक्तींकडून सुपारी घेण्यात आली असून, काँग्रेसच्या या सर्व आंदोलनांमागे आणि कारवायांमागे शहरी नक्षलवाद्यांचे डोके कार्यरत आहे, असा अत्यंत गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी लावला आहे. नागपुरात सोमवारी आयोजित एका विशेष पत्रपरिषदेदरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या महत्त्वाच्या पत्रपरिषदेला भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महामंत्री विष्णू चांगदे, रितेश गावंडे, तसेच संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना आ. परिणय फुके म्हणाले की, वर्ष २०१४ पासून देशात भाजपचे सरकार आल्यापासून काँग्रेस पक्षाकडून सातत्याने देशातील सर्वोच्च संवैधानिक संस्थांवर पूर्णपणे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. अगदी या देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्यावर आणि पराक्रमावरदेखील परदेशी विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी शंका घेतली होती. निवडणुकीमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता थेट ईव्हीएम (EVM) आणि देशाच्या निवडणूक आयोगावर अत्यंत बालीश आणि बेजबाबदार आरोप केले जात आहेत. काँग्रेसकडून सातत्याने देशाच्या प्रगतीमध्ये आणि विकासात मोठे अडथळे निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
मतदार याद्यांच्या पुनरिक्षण आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत बोलताना फुके म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होण्याची समान संधी देशातील सर्वपक्षीय राजकीय पक्षांना देण्यात आली होती. परंतु, काँग्रेसने या विधायक प्रक्रियेत सहभागी होऊन सहकार्य करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगावर निराधार आरोप करण्याचा अत्यंत सोपा मार्ग स्वीकारला. मतदार यादीतील दुबार नावांसह इतर तांत्रिक त्रुटींवर कायदेशीर आक्षेप घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, यादीतील केवळ त्रुटी दाखवून मोकळे होण्यापेक्षा ती यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेणे अधिक गरजेचे होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काँग्रेसविरोधात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्याची वेळ आल्यास भारतीय जनता पार्टी तेदेखील करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याच पत्रपरिषदेमध्ये बोलताना भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीदेखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. मतदार याद्यांवर फळ आणि खोटे आरोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी ती यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी प्रत्यक्षात अधिक मेहनत घ्यायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी यांनी आपल्या जबाबदार पदाला पूर्णपणे साजेसे असेच वर्तन व स्टेटमेंट करावे, असा परखड सल्लादेखील यावेळी तिवारी यांनी दिला.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




